साताऱ्यात महिला कॉन्स्टेबलची छेडछाड, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:00 PM2018-08-29T12:00:31+5:302018-08-29T12:03:44+5:30
महिला कॉन्स्टेबलचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याची घटना साताऱ्यात घडली. विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप माने (रा. शनी मारुती मंदिरापाठीमागे, सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
सातारा : महिला कॉन्स्टेबलचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याची घटना साताऱ्यात घडली. विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप माने (रा. शनी मारुती मंदिरापाठीमागे, सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून २५ वर्षीय महिला कॉन्स्टेबलचा पोलीस वसाहत, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या समोर तसेच राजवाडा परिसरात दिलीप माने हा पाठलाग करत होता.
त्याचबरोबर जाणूनबुजून हात व पायाला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत होता. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.