महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:19+5:302021-03-10T04:38:19+5:30
बनवडी, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचारी आदींचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ...
बनवडी, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचारी आदींचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिणुकले, पांडुरंग कोठावळे, नरहरी जानराव तसेच महिला सदस्या उपस्थित होत्या.
पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे म्हणाल्या, अलीकडच्या काही वर्षात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महिलांचा गौरव होणे गरजेचे आहे. महिलांच्या पाठबळामुळे अनेक पुरुष यशस्वी झाल्याचे आपण पाहिले आहे. यशस्वी पुरुषांच्या मागे महिलाच असतात. महिलांचा सन्मान ठेवणे हेच खरे भारतीय कर्तव्य आहे.
यावेळी महिला कर्मचाऱ्यांना सनकोट, सॅनिटायझर, मास्क देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले यांनी केले. पांडुरंग कोठावळे यांनी आभार मानले.
फोटो : ०९केआरडी०५
कॅप्शन : बनवडी, ता. कऱ्हाड येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे यांच्याहस्ते अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.