महिलांना अधिकारांबाबत जागरूक करणे आवश्यक : उज्ज्वला विधाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:59+5:302021-03-10T04:38:59+5:30

खटाव : कुटुंब ते देशाच्या विकासापर्यंत महिलांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. त्यांना त्यांच्या अधिकारांविषयी ...

Women need to be made aware of their rights: Ujjwala Vidhate | महिलांना अधिकारांबाबत जागरूक करणे आवश्यक : उज्ज्वला विधाते

महिलांना अधिकारांबाबत जागरूक करणे आवश्यक : उज्ज्वला विधाते

Next

खटाव : कुटुंब ते देशाच्या विकासापर्यंत महिलांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. त्यांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे हा महिला दिनाचा मुख्य उद्देश आहे, असे मत माजी पंचायत समिती सभापती उज्ज्वला विधाते यांनी व्यक्त केले.

खटावमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बचत गट पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्या यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी विधाते बोलत होत्या.

विधाते म्हणाल्या, आतापर्यंत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, ही उक्ती ऐकत आलो आहोत. परंतु काळ बदलला आणि या उक्तीला मागे टाकत स्त्रियांनी पुरुषांनाही मागे टाकत, सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. महिला दिनाच्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने महिलांबाबत आदर व्यक्त करतात.

यावेळी नम्रता भोसले, प्रभावती भराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. रूपाली झिरपे, सुवर्णा पवार, कविता शिंदे, शीतल राऊत, शबाना काझी, सोनाली देडीले, शाखा प्रमुख आर. व्ही. कर्णे, कॅशियर पाटोळे, स्वप्नील शिंदे, रामदास गायकवाड, बजरंग शिंदे आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविक शाखा प्रमुख आर. व्ही कर्णे यांनी केले.

कॅप्शन :

खटावमध्ये महिला दिनानिमित्त जि. म. बँकेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना माजी पं. स. सभापती उज्ज्वला विधाते.

Web Title: Women need to be made aware of their rights: Ujjwala Vidhate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.