महिलांनी अलर्ट राहायला हवं : सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:12 AM2020-01-04T00:12:13+5:302020-01-04T00:13:54+5:30

‘आजची स्त्री ही डिजिटल साक्षर असली पाहिजे. तिला डिजिटल युगातले सर्व व्यवहार सहजपणे हाताळता यायला हवेत,’ असे रोहिणी ढवळे यांनी सांगितले. कार्यशाळेसाठी मुंबई, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील कष्टकरी महिलेपासून ते अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या असंख्य प्रशिक्षणार्थी महिला सहभागी झाल्या होत्या. यासर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Women Should Alert: Satputs | महिलांनी अलर्ट राहायला हवं : सातपुते

सातारा येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात महिलांसाठी डिजिटल साक्षरता कार्यशाळेवेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्दे एक दिवसीय कार्यशाळा : महिलांनी वावरताना गाफील राहू नये, डिजिटल साक्षर गरजेचे

सातारा : ‘फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपण जगाशी जोडलो गेलोय. त्यामुळे महिलांनी येथे वावरताना गाफील राहून चालणार नाही. कारण नकळतपणे अनेकदा येथे महिलांना जीवघेण्या प्रसंगालाही सामोरे जावे लागते, हे सायबर क्राईमच्या घटनांवरून समोरही येत आहे. म्हणून महिलांनी डिजिटल साक्षर होण्याबरोबरच अलर्ट राहायला हवं,’ असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले.

राज्य महिला आयोग आणि सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात महिलासाठी एकदिवसीय डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या संचालिका अंजनी काकडे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. मनीषा बर्गे, प्रशिक्षक भक्ती भाटवडेकर व सामुदायिक विकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे व अरुण जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘आजची स्त्री ही डिजिटल साक्षर असली पाहिजे. तिला डिजिटल युगातले सर्व व्यवहार सहजपणे हाताळता यायला हवेत,’ असे रोहिणी ढवळे यांनी सांगितले.

अंजनी काकडे, युवराज पाटील, अ‍ॅड. मनीषा बर्गे यांचीही भाषणे झाली. महिलांसाठी या कार्यशाळेसाठी मुंबई, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील कष्टकरी महिलेपासून ते अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या असंख्य प्रशिक्षणार्थी महिला सहभागी झाल्या होत्या. यासर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यशाळेच्या यशस्वीसाठी किरण कांबळे, योगेश मस्के, विजय भंडारे, मुकेश गंगावणे, संकेत मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. प्रतीक्षा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल देवकांत यांनी आभार मानले.


मेल ओपन कसे करायचे?
‘डिजिटल साक्षरता का आणि कशासाठी’ याविषयीचा उद्देश स्पष्ट करत मिलिंद कांबळे यांनी माहिती दिली. भक्ती भाटवडेकर यांनी ई-मेल अकाउंट कसे ओपन करायचे, योजना वेबसाईटवर कशा पाहायच्या, शासकीय अ‍ॅप्स कसे डाऊनलोड करायचे, आॅनलाईन बँकिंग व्यवहार कसा हाताळायचा? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनकेले.

 

  • मेल ओपन कसे करायचे?

‘डिजिटल साक्षरता का आणि कशासाठी’ याविषयीचा उद्देश स्पष्ट करत मिलिंद कांबळे यांनी माहिती दिली. भक्ती भाटवडेकर यांनी ई-मेल अकाउंट कसे ओपन करायचे, योजना वेबसाईटवर कशा पाहायच्या, शासकीय अ‍ॅप्स कसे डाऊनलोड करायचे, आॅनलाईन बँकिंग व्यवहार कसा हाताळायचा? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनकेले.

Web Title: Women Should Alert: Satputs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.