सातारा: वाठारमधील नव्या दारू दुकानास महिलांचा कडाडून विरोध, ग्रामसभेत महिलांचा उठाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:38 PM2022-11-16T18:38:39+5:302022-11-16T18:39:01+5:30

कऱ्हाड : वाठार (ता. कऱ्हाड) येथे नवीन वाइन शॉप, देशी दारू दुकान व बीअर बार विक्री परवान्यास महिलांनी कडाडून ...

Women strongly oppose the new liquor shop in Vathar Satara District | सातारा: वाठारमधील नव्या दारू दुकानास महिलांचा कडाडून विरोध, ग्रामसभेत महिलांचा उठाव

सातारा: वाठारमधील नव्या दारू दुकानास महिलांचा कडाडून विरोध, ग्रामसभेत महिलांचा उठाव

googlenewsNext

कऱ्हाड : वाठार (ता. कऱ्हाड) येथे नवीन वाइन शॉप, देशी दारू दुकान व बीअर बार विक्री परवान्यास महिलांनी कडाडून विरोध केला. शिवाय इथून पुढे अशा प्रकारे कुठल्याही दुकानास परवानगी देण्यात येऊ नये, असा एकमुखी प्रस्तावही महिलांच्या वतीने सादर करण्यात आला. तो ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाठार गावच्या हद्दीत पूर्वीपासून मद्य विक्री परवाना असलेले शासनमान्य अधिकृत बीअर बार शॉपीचे दुकान आहे. त्यातच गावातील एका ग्रामस्थाकडून नवीन बीअर बार, वाइन शॉपी व देशी दारू विक्रीच्या उद्देशाने परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने त्याला परवानगी द्यायची की नाही? यासाठी महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभाताई पाटील होत्या. यावेळी सदस्या अश्विनी पाटील, ग्रामविकास अधिकारी मोमीन, महिला यांची उपस्थिती होती.

ग्रामविकास अधिकारी मोमीन यांनी नवीन दारू दुकान संदर्भात परवानगीचा विषय सभेपुढे मांडला .त्यास उपस्थित असलेल्या २००वर महिलांनी कडाडून विरोध केला. कोणत्याही प्रकारच्या अशा दुकानास परवानगी देऊ नये अशी एकमुखी मागणीही ग्रामसभेपुढे केली.ठराव मंजूर करत असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

Web Title: Women strongly oppose the new liquor shop in Vathar Satara District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.