लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत वूमन वॉरियर्स ऑन ड्युटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:28+5:302021-06-02T04:28:28+5:30

सातारा: जिल्ह्यावर कोरोनाचे संकट एक वर्षापासून आहे. यासोबतच रात्रीचा बंदोबस्त, रात्रगस्त आणि संचारबंदीच्या ड्युटीसाठी महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी ...

Women Warriors on Duty, keeping the Lakers at home until late at night! | लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत वूमन वॉरियर्स ऑन ड्युटी!

लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत वूमन वॉरियर्स ऑन ड्युटी!

Next

सातारा: जिल्ह्यावर कोरोनाचे संकट एक वर्षापासून आहे. यासोबतच रात्रीचा बंदोबस्त, रात्रगस्त आणि संचारबंदीच्या ड्युटीसाठी महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी लेकरांना घरी ठेवून रात्रंदिवस ड्युटी बजावत असल्याचे वास्तव आहे. या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वुमेन वॉरिअर्स असून, वारंवार फोन करून लेकरांची काळजी घेत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले.

सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्युटी देताना खरोखर सहानुभूतीचा विचार केला जातो, ही एक जमेची बाजू आहे.

पोलीस दलातील या वूमन वॉरियर्सना ज्याप्रमाणे ड्युटी फर्स्ट ही काळजी आहे, तेवढीच काळजी कुटुंबातील सदस्यांची असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आधी ड्युटी योग्यरीत्या बजावतात आणि नंतरच कुटुंब व लेकरांचीही तेवढीच काळजी करीत असल्याची माहिती महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. ड्युटीवर असतानाही मुलांची काळजी घेण्यासाठी त्या तत्पर असतात. रात्र ड्युटीसाठी घरातून बाहेर निघताना मुले रडत आईच्या मागे लागतात. मात्र, अशा वेळी काळजावर दगड ठेवून खाकीत दडलेली आई घराबाहेर पडते.

रात्रीची ड्युटी बजावत असताना मुले सुरक्षित आहेत का, याची वारंवार फोन करून घरी त्या विचारत असतात.

चौकट: कुटुंबाची काळजी मोबाईलवरूनच

वूमन वॉरियर्स रात्रीची ड्युटी करीत असताना कुटुंबाची सदस्यांची काळजी मोबाईलवर संवाद साधून घेत असतात.

रात्री नऊला ड्युटीला आल्यानंतर रात्री अकरापर्यंत घरी फोन करून त्या मुलांची व घरातील ज्येष्ठांची विचारपूस करत असतात.

काही महत्त्वाचे काम असेल तर त्यांच्या मैत्रिणींचीही मदत घेत असल्याची माहिती महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.

कोट: प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षेसाठी समर्पित आहेत. सध्या कोरोनाचे भीषण संकट नागरिकांवर ओढवले आहे. प्रत्येकाने नियम पाळावे, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकारी कर्मचारी कुटुंबीयांना दूर ठेवून रस्त्यावर तैनात आहेत. त्यामुळे पोलिसांविषयी आदराची भूमिका ठेवावी.

अण्णासाहेब मांजरे पोलीस निरीक्षक सातारा शहर

..........

सन उत्सवामध्ये आई घरी नसल्याचे अनेकदा मी अनुभव घेतले आहेत. त्यामुळे मोठा सण-उत्सव असताना आई घरी नसणे म्हणजे मोठी दुःखाची बाब आहे. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी आमची आई रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभी आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

-निहाल जाधव

नागरिकांच्या सुरक्षेसाठी ड्युटी करणे गौरवाचे कार्य आहे. एक महिला पोलीस असतानाही आपण कुटुंबासोबतच नागरिकांच्या मनातही सुरक्षित भावना निर्माण करीत आहोत, ही माझ्यासाठी मोठी बाब आहे.

-किशोरी निकम, सातारा शहर पोलीस ठाणे

..........

माझा तीन वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव मयंक आहे. मी ड्युटीवर घरातून येताना मुलगा रडत मागे लागतो. तेव्हा त्याला थोडे गाडीवरून फिरवून आणल्यानंतर तो रडायचं थांबतो. रात्री नऊ ते सकाळी नऊ अशी आमची आठवड्यातून एक वेळ किंवा दोनदा ड्युटी असते. आमचे वरिष्ठ आणि पोलीस स्टेशनमधील इतर सहकारी आम्हाला रात्र ड्युटीला चांगली वागणूक देतात आणि कामामध्ये चांगले सहकार्यही करतात.

गौरी शिंगाडे, सातारा शहर पोलीस ठाणे

........

मला पाच वर्षांचा मुलगा राजवीर आणि दीड वर्षांची मुलगी राजलक्ष्मी, अशी दोन मुले आहेत. घरातून ड्युटीवर येताना माझी मुलेही माझ्या मागे लागतात. त्या वेळी फार कसं तरी वाटतं, पण ड्युटीही तितकीच महत्त्वाची असते. पीसीआर व्हॅनवर नाईट पेट्रोलिंग आम्ही करत असतो. त्या वेळी मुलांची अधून-मधून आठवण आणि काळजीही वाटत असते. सकाळी घरी गेल्यानंतर मुलांना कधी पाहते असे वाटते.

मोनाली पवार, सातारा शहर पोलीस ठाणे

चौकट: एकूण पोलीस अधिकारी- ५७

महिला पोलीस अधिकारी-२४

एकूण पोलीस-१५३६

महिला पोलीस-४२

Web Title: Women Warriors on Duty, keeping the Lakers at home until late at night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.