Satara Crime: ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आल्या, चोरी करुन गेल्या; गुन्हा नोंद

By नितीन काळेल | Published: June 13, 2023 01:31 PM2023-06-13T13:31:10+5:302023-06-13T13:32:17+5:30

सातारा : सातारा शहरातील एका ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी चांदीच्या जोडव्यांची चोरी केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात ...

Women who came as customers stole from a jeweler in Satara city | Satara Crime: ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आल्या, चोरी करुन गेल्या; गुन्हा नोंद

संग्रहित छाया

googlenewsNext

सातारा : सातारा शहरातील एका ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी चांदीच्या जोडव्यांची चोरी केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी तीन महिलांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी दिनेश दत्तात्रय देशमुख (रा. बसाप्पा पेठ, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार दि. जुना मोटार स्टॅंड येथील एका ज्वेलर्समध्ये दि. ११ जून रोजी दुपारी साडे बारा ते एकच्या दरम्यान चोरीचा प्रकार घडला. ज्वेलर्समध्ये अनोळखी तीन महिला आल्या होत्या. एक महिलेचे वय ३५ वर्षांदरम्यान होते. तर दुसरीचे ४० ते ४५ आणि तिसरी १८ ते १९ वयोगटातील होती.

संबंधित महिलांनी दुकानातून चांदीची जोडवी असलेले प्लास्टिकचे बाॅक्स चोरून नेले. त्यामध्ये चांदीचे ८ ते ९ जोडव्यांचे जोड होते. याची किंमत सुमारे ४० हजार रुपये होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे. हवालदार साबळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Women who came as customers stole from a jeweler in Satara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.