मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात रणरागिणींचा एल्गार, साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

By सचिन काकडे | Published: November 3, 2023 07:01 PM2023-11-03T19:01:23+5:302023-11-03T19:02:11+5:30

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी ...

Women's bike rally in Satara for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात रणरागिणींचा एल्गार, साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात रणरागिणींचा एल्गार, साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी शुक्रवारी सायंकाळी दुचाकी रॅली काढून साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी देण्यात आलेल्या ‘एक मराठा..लाख मराठा’ या घोषणेने शहर दणाणून गेले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू केलेले उपोषण स्थगित केले असले तरी साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साताऱ्यातही दहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषण सुरू आहे.

या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शुक्रवारी महिलांकडून दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून या रॅलीस प्रारंभ झाला. दुचाकीला लावलेले भगवे झेंडे, भगव्या टोप्या व फेटे परिधान करून रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी ‘एक मराठा.. लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी.. जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कोणाच्या बापाच्या’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.

ही रॅली पोवई नाक्यावरुन शाहू चौक मार्गे राजपथाकडे मार्गस्थ झाली. यानंतर गोलबाग, मोतीचौक, ५०१ पाटी, पोलिस मुख्यालय मार्ग, शिवतीर्थ येथून उपोषणस्थळी आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला. शंभरहून अधिक महिलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.

आदेश येईपर्यंत माघार नाही..

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. शुक्रवारी सकाळी कोडोलीसह परिसरातील गावांनी या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला. वरून आदेश येईपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती, आंदोलकांकडून देण्यात आली.

Web Title: Women's bike rally in Satara for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.