बाळसिद्ध विद्यालयात महिला दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:28+5:302021-03-13T05:10:28+5:30
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील बाळसिद्ध विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका नजमा ...
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील बाळसिद्ध विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका नजमा इनामदार, शीला माने, पल्लवी साळुंखे, रेखा पाटील, संगीता शेवाळे, मुमताज शेखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात अंगणवाडी सेविका व आशा सेविकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम केले. जागतिक महिला दिनी या महिलांचा विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील मुलींना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सानिका शेवाळे, प्रणाली जाधव या विद्यार्थिनींनी तसेच संगीता शेवाळे, शंकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक हनुमंत सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. रवींद्र पाटील, भीमराव भोसले, सानिका काळे, सानिका तांबेकर, सानिका साळुंखे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक हनुमंत सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी मुंडे यांनी केले.
कोळे येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ
कुसूर : कोळे, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता थोरात, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सरपंच संगीता कराळे, उपसरपंच समाधान शिनगारे, पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, सदस्य उत्तम पाटील उपस्थित होते. साठ वर्षांवरील वयोवृद्ध व ४५ ते ५९ वर्षांमधील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. कोरोनाचा धोका टळला नाही. ग्रामस्थांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन सुनीता थोरात यांनी केले.
वाचनालयाकडून महिलांचा सन्मान
रामापूर : पाटण येथील नागोजीराव पाटणकर स्मारक वाचनालयाच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिला शक्तीच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून शहरातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंगणवाडी पर्यवेक्षिका सुषमा पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी इंडो-तिबेट पोलीस दलात निवड झालेल्या रोहिणी पवार, अस्मा यादव यांचा सत्कार करण्यात आला.
उंडाळे येथील चौकात हायमास्ट दिवे मंजूर
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील मुख्य चौकात चांगल्या दिवाबत्तीची सोय व्हावी, यासाठी गावातील मुख्य चार ठिकाणी हायमास्ट दिवे मंजूर करण्यात आले असून या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हे काम होत आहे. उंडाळे येथील बाजार चौक, सवादे ते तुळसण मार्ग, बसस्थानक, प्रशासकीय इमारत व बौद्ध वस्ती येथे हे हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामासाठी राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील, दादासाहेब नांगरे, संजय काकडे, उदय पाटील यांनी पाठपुरावा केला. तत्कालीन सरपंच दादासाहेब पाटील व विद्यमान पदाधिकारी बापूराव पाटील, संजय सुतार, ग्रामसेवक शरद चव्हाण यांनी ग्रामपंचायत मागणी ठराव व या कामासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली.
तारळेत अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन
पाटण : तारळे, ता. पाटण येथील जाधववाडीतील अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून ही इमारत मंजूर झाली आहे. मंदिरात असणाऱ्या मुलांना यामुळे हक्काची इमारत मिळणार असून समाधान व्यक्त होत आहे. गजानन जाधव, अभिजीत पाटील, रमेश पाटील, किशोर बारटक्के, दीपक यादव, रघुनाथ पुजारी, सुनील भांडवलकर, अक्षय जाधव, रमेश महाजन, सुधाकर बेंद्रे, बाळासाहेब चव्हाण, शंकर गोडसे, दादासाहेब माळी, विश्वास खांडके, सुनील खंडके, दादा सुतार, आशिष यादव, विकासराव जाधव उपस्थित होते.