स्त्रियांच्या निर्णय क्षमतेला वाव देणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:09+5:302021-03-14T04:34:09+5:30
येथील शिवाजी विद्यालयात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिल्पा बदियाणी होत्या. मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे, पर्यवेक्षक ...
येथील शिवाजी विद्यालयात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिल्पा बदियाणी होत्या. मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे, पर्यवेक्षक एस. बी. देसाई, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, संचालिका मनिषा साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नीता पाटील म्हणाल्या, समाजातील स्त्रीभ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रध्दा, अनिष्ट चालीरीती या प्रथेविरुद्ध स्रियांनी खंबीरपणे लढा दिला पाहिजे. याविरोधात महिलांनी लढा दिल्यास त्यामध्ये त्यांना निश्चितच यश मिळेल. सध्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. पुरूषांच्या बरोबरीने त्या कार्यरत आहेत. स्वावलंबी बनल्या आहेत. त्यांच्यात निर्णयक्षमता आहे. मात्र, त्याला वाव देण्याची गरज असून निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतल्यास निश्चितच त्यांचे निर्णय बरोबर ठरतील.
ज्येष्ठ शिक्षक टी. डी. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी प्रमुख पाहुण्या नीता पाटील यांच्या हस्ते शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. ए. एस. पाटील यांनी प्रास्तविक केले. बी. डी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ए. बी. रोडे यांनी आभार मानले.
फोटो : १३केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड येथे शिवाजी विद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नीता पाटील यांचे भाषण झाले.