पार्ले येथे महिलांची शेतीशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:06+5:302021-09-27T04:42:06+5:30

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे राज्य कृषी विभागामार्फत सोयाबीन पीक व ई-पीक पाहणी याविषयी महिलांची शेतीशाळा आयोजित ...

Women's farm at Parle in high spirits | पार्ले येथे महिलांची शेतीशाळा उत्साहात

पार्ले येथे महिलांची शेतीशाळा उत्साहात

Next

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे राज्य कृषी विभागामार्फत सोयाबीन पीक व ई-पीक पाहणी याविषयी महिलांची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोल्हापूरचे कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरूदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, सरपंच अश्विनी मदने, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख नलवडे उपस्थित होते.

उमेश पाटील म्हणाले, ‘महिलांनी एकत्रित येऊन एखादा प्रक्रिया उद्योग उभा करुन आर्थिक उन्नती साधावी. त्यासाठी अनुदान प्राप्त होते.’ गुरुदत्त काळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करावे. त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या उद्योग उभारणीची माहिती दिली. सैदापूरचे मंडल अधिकारी विनय कदम यांनी ई-पीक पाहणीबाबत मोबाईल ॲपचा वापर कशा पद्धतीने करावा, याविषयी मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक दाखवले.

यावेळी कृषी सहाय्यक मनिषा कुंभार, कृषी पर्यवेक्षक पी. व्ही. मोरे, नवनाथ मदने, एस. व्ही. चव्हाण, एस. एम. गायकवाड, बी. बी. माळी उपस्थित होते. मनिषा कुंभार यांनी प्रास्तविक केले तर विशाल जगदाळे यांनी आभार मानले.

फोटो ओळ

पार्ले येथील महिलांची शेतीशाळा कार्यक्रमात कोल्हापूरचे कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी माहिती दिली. यावेळी गुरूदत्त काळे, दौलतराव चव्हाण अविनाश नलवडे, रियाज मुल्ला उपस्थित होते.

Web Title: Women's farm at Parle in high spirits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.