बांधकाम कामगारांचा साताऱ्यात मोर्चा महिलांचाही सहभाग : घर बांधण्यासाठी अनुदानाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:48 AM2019-01-08T00:48:29+5:302019-01-08T00:48:45+5:30
सातारा : बांधकाम व्यवसायात काम करणाºया कामगारांना हक्काचे घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये द्यावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ...
सातारा : बांधकाम व्यवसायात काम करणाºया कामगारांना हक्काचे घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये द्यावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी साताºयात मोर्चा काढण्यात आला.
कामगारांना हक्काच्या घरासाठी ५ लाख रुपये द्यावेत, वयाच्या ५५ व्या वर्षांनंतर निवृत्तीवेतन ५ हजार रुपये द्यावेत, ज्यांना साहित्य खरेदीचे रुपये ५ हजार मिळाले नाहीत, ते द्यावेत, विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती द्यावी, बांधकाम कामगारांना मोफत आरोग्य सुविधा द्यावी, मंडळाचे ओळखपत्र द्यावे, मंडळासाठी सेस रक्कम मोठ्या प्रमाणात वसूल करून कामगार कल्याण मंडळात आर्थिक भर घालावी, नोंदणीदरम्यान अडाणी व अज्ञानी गरीब कामगारांशी अवमानास्पद वर्तणूक करू नये, पाणी व वाळू कमी पडल्याने बांधकाम असल्यास त्या दिवसात बांधकाम कामगारांना अडीचशे रुपये बेरोजगार भत्ता द्यावा किंवा ३५ किलो रेशन देण्यात यावे.
बांधकाम कामगारांनी केलेल्या कामाची थकीत रक्कम अनेकवेळा घरमालक, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर किंवा इंजिनिअर बुडवितात, ती बुडीत रक्कम वसूल करण्यासाठी सहायक कामगार आयुक्ताने हस्तक्षेप करून रक्कम वसूल करून द्यावी व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, बांधकाम कामगार कल्याण मंडळासाठी स्वतंत्र पूर्ण वेळ कर्मचाºयाची नियुक्ती करावी आदी मागण्या केल्या आहेत.
माणिक अवघडे, शिवाजी कचरे, अमर राजे, निवास यमगर, संतोष करणे, भानुदास माळी, विजय जाधव, बसू शेट्टी, शांताराम कारंडे, महादेव सुतार, सचिन शेळके, धनाजी चव्हाण, सखाराम नवले, आयाज आत्तार, उद्धव क्षीरसागर, नितीन आवळे, आनंदी अवघडे, सोमनाथ बोडरे, दादासो पाटील, नीलेश खुडे, अंकुश फरांदे, विजय माने, मधुकर कदम,रामचंद्र अवघडे उपस्थित होते.
विकास ठप्प; कामगार कल्याण मंडळ स्थापन
सहायक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, देशपातळीवर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी होत असलेल्या संपात कामगार सहभागी झाले आहेत. बांधकाम कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळ झाले; पण कामगारांचा विकास झाला नाही.
सातारा येथे सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला.