दुर्गम भागातील महिलांचे कार्य कौतुकास्पद
By admin | Published: May 25, 2017 11:18 PM2017-05-25T23:18:34+5:302017-05-25T23:18:34+5:30
दुर्गम भागातील महिलांचे कार्य कौतुकास्पद
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणंद/म्हसवड : अतिशय दुर्गम भागात काम करून देखील येथील महिला उद्योजक आपला व्यवसायाचा विस्तार करत आहेत, ही बाब अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्वगार ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या पत्नी चेरी ब्लेअर यांनी येथे काढले.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या पत्नी व चेरी ब्लेअर फाऊंडेशन फॉर वुमेनच्या संस्थापिका चेरी ब्लेअर यांनी आज माणदेशी फाऊंडेशन म्हसवड च्या लोणंद येथील शाखेस भेटदिली. माणदेशी फाऊंडेशन व चेरी ब्लेअर फाऊंडेशन फॉर वुमेन यांच्या भागीदारी अंतर्गत गेल्या दोन वर्षांत ५५० हून अधिक महिला नवउद्योजिकांना प्रशिक्षण व व्यवसाय साहाय्य देण्यात आले आहे. लोणंद,दुधेबवी,निंभोरे या गावातील महिला उद्योजकांचे कार्य पाहताना वत्यांच्याशी संवाद साधताना चेरी ब्लेअर अक्षरश: भारावून गेल्या.निंभोरेगावातील प्रीती भिसे यांनी माणदेशी बिझनेस स्कुलमधून प्रशिक्षण घेतआपल्या स्वत:च्या आयुष्यात परिवर्तन घडून आणले व आपल्या व्यवसायाच्यानफ्यातून स्वत:चे घर बांधले.त्यांचा हा प्रवास बघून भारावून गेलेल्या चेरी ब्लेअर म्हणाल्या की, ‘तुमच्या कुटुंबाला व तुम्हाला याबाबत अभिमान वाटायला हवा. अशा अद्वितीय व कष्टकरी आईच्या पाठीमागे तिची मुले खंबीरपणे उभी राहतील, अशी मी आशा करते.
या सर्व महिलांचे कार्य बघताना मला अत्यंत आनंद होत असून या महिलांना देण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम कितीमहत्त्वाचे आहे,हे त्यांच्या यशाने अधोरेखित होते.’ दुर्गम भागातील खेड्यांमध्ये वास्तव्य असणाऱ्या महिला देखील आपल्या व्यवसायाचा विस्तार करीत असून त्यांच्याकडे कुठल्याही फॅन्सी डिग्रीज नसूनही त्यांची मुले-मुली एक दिवस लंडन व अमेरिकेत शिकायला येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
सायकलींचे वाटप
या सर्वांची प्रगती व वाटचालीचा आढावा घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सातारा जवळील लोणंद, दुधेबवी, निंभोरे या गावांतील या महिला उद्योजकांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच माणदेशी महिला बँक व माणदेशी फाऊंडेशनच्या लोणंद शाखेला देखील भेट दिली. या दरम्यान त्यांनी या भागातील विद्यार्थींनींनात्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी दहा सायकलींचे वाटप केले. चेतना गाला-सिन्हा म्हणाल्या की, ‘उद्योजक महिलांच्या व्यावसायिक गरजांनाअगदी वर्ल्ड बँक ते स्थानिक बँकांपर्यंत प्राधान्य देणे गरजेचे आहे.’