जिल्ह्यात ऊन वाढू लागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:52+5:302021-03-04T05:14:52+5:30
सातारा : जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी होत चालले असून, ऊन वाढू लागले आहे. मागील पाच दिवसांत तर साताऱ्यासह पूर्व ...
सातारा : जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी होत चालले असून, ऊन वाढू लागले आहे. मागील पाच दिवसांत तर साताऱ्यासह पूर्व भागातील कमाल तापमान ३५ अंशावर राहिले आहे. त्यामुळे लवकरच उन्हाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात यंदाच्या हिवाळी ऋतूत थंडीचे प्रमाण कमी राहिले आहे. एकवेळच फक्त साताऱ्याचे किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरले होते. डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात हे तापमान नोंदले गेले. मात्र, त्यानंतर कधीही तापमान १० अंशाच्या खाली आले नाही, तर हिवाळी ऋतूत सतत किमान तापमान १५ अंशाच्यावरच राहिले. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका अनुभवयास मिळालाच नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून किमान तापमान वाढतच चालले आहे. त्यामुळे थंडी गायबच आहे. त्यातच आता कमाल तापमानही वाढत चालले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.
सातारा शहराचे कमाल तापमान ३५ अंशावर आहे, तर पूर्व ग्रामीण भागात तापमान ३६ अंशाच्या पुढे जाऊ लागलंय. सोमवारी साताऱ्यात कमाल तापमान ३६ अंश होते, तर महाबळेश्वरचा पारा ३०.०३ नोंदला गेला. त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारीही साताऱ्याचे कमाल तापमान ३६ अंशापर्यंत होते. किमान आणि कमाल तापमान वाढत चालल्याने थंडी गायब झाली असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
सातारा शहरातील कमाल तापमान असे :
दि. २१ फेब्रुवारी ३०.०७, दि. २२ फेब्रुवारी ३१.०३, दि. २३ फेब्रुवारी ३२.०९, दि. २४ फेब्रुवारी ३४, दि. २५ फेब्रुवारी ३४.०४, दि. २६ फेब्रुवारी ३४.०५, दि. २७ फेब्रुवारी ३५.०३, दि. २८ फेब्रुवारी ३६.०२, दि. १ मार्च ३६, दि. २ आणि ३ मार्च ३५.०८.
.....................................................