सुरळीत वीज पुरवठ्यासाठी कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:39 AM2021-05-23T04:39:58+5:302021-05-23T04:39:58+5:30

कुसूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी उपकेंद्रांतर्गत असलेल्या परिसरात झाडे, झाडांच्या फांद्या मोडून विद्युत ...

Work on the battlefield by the staff for smooth power supply | सुरळीत वीज पुरवठ्यासाठी कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम

सुरळीत वीज पुरवठ्यासाठी कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम

Next

कुसूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी उपकेंद्रांतर्गत असलेल्या परिसरात झाडे, झाडांच्या फांद्या मोडून विद्युत वाहिन्यांवर पडल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यात तौक्ते वादळाचाही फटका बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिणामी खंडित वीजपुरवठा दुरुस्तीकामी अनेक अडचणींना तोंड देत वितरण विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत.

परिसरात सोमवार, दि. ५ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे विभागात मोठे नुकसान झाले होते. झाडे, झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याने कऱ्हाड तालुक्यातील कोळे, आणे, अंबवडे, कोळेवाडी आणि बामणवाडी परिसरात विद्युत वितरण विभागाचे २५ खांब मोडून पडले, तर वीजवाहिन्या तुटल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. मोडून पडलेल्या खांबावरील वाहिन्या सोडवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अंगावर पाऊस झेलत उभ्या पावसातही कोळेवाडी सबस्टेशनचे जनमित्र रात्रीच्या बारा वाजले तरी लाईनवर काम करताना दिसत आहेत.

चौकट

पाऊस मोठा झाल्याने शेतात पाणी साचून राहिल्याने खांब मोडलेल्या ठिकाणी नवीन खांब घेऊन जाणे अडथळ्याचे ठरत आहेत. अनेक ठिकाणी खांब वाहून नेण्यासाठी रस्तेच नाहीत. परिणामी पंचवीस फूट लांब आणि दोनशे ते अडीचशे किलो वजनाचे सिमेंटचे खांब वाहून नेण्यात अडथळे येत आहेत. यातूनही मार्ग काढत उच्चदाबाचे थ्री फेजचे बारा खांब उभे करून गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील विद्युत पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला, तर गावठाणाला विद्युत पुरवठा करणारे कमी दाबाचे सिंगल फेज तेरा खांब उभे करण्याचे काम गतीने सुरू आहे.

===Photopath===

220521\img-20210519-wa0004.jpg

===Caption===

विज वितरण कर्मचारी कामं करताना

Web Title: Work on the battlefield by the staff for smooth power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.