कोरोनाकाळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य प्रशंसनीय : पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:02+5:302021-06-01T04:29:02+5:30
चाफळ : ‘कोरोनाकाळात जिवाची बाजी लावत चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांनी केलेले काम खरोखर प्रशंसनीय असे आहे. विभागातील ...
चाफळ : ‘कोरोनाकाळात जिवाची बाजी लावत चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांनी केलेले काम खरोखर प्रशंसनीय असे आहे. विभागातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सोईसुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी दिली.
चाफळ (ता. पाटण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची बैठक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास चाफळ पंचायत समिती गणाच्या सदस्या रुपाली पवार, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हणमंत यादव, चंद्रकांत देशमुख, चाफळचे उपसरपंच काटे, वैद्यकीय अधिकारी सचिन कुराडे, आरोग्य सहायक राजेंद्र खरात, मकसूद मोमीन, दत्तात्रय गायकवाड, राजेंद्र राऊत, सचिन साळुंखे, श्रीकांत डोणोलीकर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील अडचणीविषयी सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी कोरोनाकाळात चांगले काम केल्याबद्दल डॉ. कुराडे व सर्व कर्मचाऱ्यांचा राजेश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधिकारी सचिन कुराडे, मंदा माने, धनाजी लोंढे, सचिन साळुंखे उपस्थित होते.