हिंगणगाव सोसायटीचे कार्य कौतुकास्पद : प्रल्हादराव साळुंखे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:41+5:302021-03-18T04:38:41+5:30
आदर्की : ‘हिंगणगाव विविध कार्यकारी सोसायटीने शेतकऱ्यांचे हित जोपासत असताना त्यांची आरोग्यसंपदा टिकवण्यासाठी अल्प दरात स्वच्छ पाणी देण्यासाठी आरो ...
आदर्की : ‘हिंगणगाव विविध कार्यकारी सोसायटीने शेतकऱ्यांचे हित जोपासत असताना त्यांची आरोग्यसंपदा टिकवण्यासाठी अल्प दरात स्वच्छ पाणी देण्यासाठी आरो पाणी फिल्टर मशीन बसवल्याने हिंगणगाव सोसायटीने सभासदांच्या आरोग्याची काळजी घेतल्याचे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव सांळुखे-पाटील यांनी केले.
हिंगणगाव (ता. फलटण) येथे हिंगणगाव विविध कार्यकारी सोसायटीने आरो-पाणी फिल्टर मशीनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक व ग्रामपंचायत सदस्य सुरेश भोईटे, रमेश भोईटे, चेअरमन पोपट ठोंबरे, व्हा. चेअरमन सविता शिंदे, माजी चेअरमन सुरेश भोईटे, विजय भोइटे, धनंजय ढमाळ, रामदास भोईटे, विलास भोईटे, सचिन ठोंबरे, नानासोा. भोईटे, राहुल काकडे, सुभाष भोईटे, निलेश पिसाळ, सुनील भोईटे, अलंकार भोईटे, सोनू भोईटे, संजय घोरपडे, गणपत कणसे, भरत भोईटे आदी संचालक, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. सुरेश भोईटे यांनी स्वागत केले. सोसायटीचे सचिव चव्हाण अण्णा यांनी आभार मानले. (वा.प्र.)
१७आदर्की जाहिरात
फोटो : हिंगणगाव सोसायटीने उभारलेल्या पाणी फिल्टर मशीनचे उद्घाटन करताना प्रल्हादराव साळुंखे पाटील. समवेत सुरेश भोईटे, पोपट ठोंबरे आदी.