नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:26 AM2021-07-20T04:26:09+5:302021-07-20T04:26:09+5:30

पुसेगाव : ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आलेले असून ...

The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable | नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद

googlenewsNext

पुसेगाव : ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आलेले असून प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करून सामाजिक बांधीलकी जपण्यात येत आहे. समर्थ बैठकीच्या माध्यमातून उत्तम संस्कार मिळत असल्याचे प्रतिपादन कोरेगाव-खटाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी केले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग यांच्यावतीने महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी करंजओढा (बुध, ता. खटाव) येथे वृक्षारोपण झाले.

वृक्षारोपणप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, बुधचे सरपंच अभयसिंहराजे घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे, ललगुण-सरपंच जयवंत गोसावी, शिंदेवाडी सरपंच तानाजी फाळके, उपसरपंच सुनील फाळके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश यादव, मार्केट कमिटी संचालक राजेंद्र कचरे, डॉ. घाडगे, गणेश सातपुते उपस्थित होते.

वृक्षारोपण करून विश्वसेवा, राष्ट्रसेवा, मानवजातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातून आंशिक मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संगोपन महत्त्वपूर्ण आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो वृक्षांचे संगोपन अत्यंत नियोजनपूर्वक केले जात असून या सामाजिक चळवळीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.

पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन यासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने सदस्यांनी विविधप्रकारची फळझाडे, औषधी झाडे लावून संरक्षणासाठी प्रतिष्ठानद्वारे सभोवताली बांबूचे बॅरिगेटस, कुंपन करण्यात येणार आहे.

ग्रामस्थ, सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दोन किमी परिसरात आंबा, सीताफळ, रामफळ, जांभूळ, पळस, उंबर, करंज, कडूलिंब, बेल, जंगली अशा विविध प्रकारच्या ३०० झाडांची लागवड करण्यात आली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.

चौकट

डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग यांच्यावतीने गेल्या १२ वर्षांपासून आतापर्यंत फळझाडे, औषधी वनस्पती, अशोक, सुरू, सिल्व्हा, वड, पिंपळ, आवळा, बेहडा आदी प्रकारांसह झाडांचे वृक्षारोपण करून प्रतिष्ठानच्या सदस्यांकरवी त्याचे उत्तम संरक्षण, संवर्धन केले जात आहे. शेकडो झाडे जगवून शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव येथील झाडे हस्तांतरित करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया

डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपणाचे कार्य कौतुकास्पद आहे. अनेक समाजहितोपयोगी उपक्रमांतून समाजात जनजागृती होण्यास मदत होत आहे. अनेक पिढ्यांपासून समाजसेवेचे कार्य करत असलेल्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यास आमचे पूर्णतः सहकार्य असेल.

महेश शिंदे, आमदार, कोरेगाव-खटाव विधानसभा

प्रतिक्रिया

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य स्तुत्य असून प्रेरणा देणारे आहेत. या नि:स्वार्थ उपक्रमातून समाजसेवा घडत असून प्रतिष्ठानचे उपक्रम गौरवास्पद आहेत.

अविनाश फडतरे / उपमुख्य कार्यकारी अधिकारी / जिल्हा परिषद

फोटो नेम : १९ बुध

फोटो ओळ : बुध, ता. खटाव येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी आमदार महेश शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.