राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कामकाज कौतुकास्पद : चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:00+5:302021-04-16T04:40:00+5:30
फलटण : राज्यात कोरोनाची वेगाने वाढ होत असताना, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ...
फलटण : राज्यात कोरोनाची वेगाने वाढ होत असताना, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन केलेले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका व शहर यांनी ब्लड बॅंक फलटण येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. समाजाची गरज ओळखून आयोजित केलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद आहे, असे मत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण व सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याहस्ते पार पडले.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्यानंतर अल्पकाळात विद्यार्थी सेलने सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
महाराष्ट्र विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, गोविंद मिल्क ॲन्ड मिल्क प्रोडक्ट्सचे संचालक सत्यजितराजे संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
रक्तदान शिबिरास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर कदम, जिल्हा सरचिटणीस आदित्य भोईटे, तालुकाध्यक्ष अभिजित निंबाळकर, तालुका उपाध्यक्ष नीलेश जठार, निरंजन पिसाळ, तालुका सरचिटणीस गौरव पवार, प्रतीक पवार, तालुका संघटक प्रसाद जाधव, प्रथमेश शेलार, प्रताप नाळे, स्वप्निल पिसाळ, शहराध्यक्ष आकाश सोनवलकर, शहर उपाध्यक्ष गौरव नष्टे, शहर संघटक ओम पवार या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर उत्स्फूर्तरित्या पार पाडले.
फोटो :
रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते.