शिवसमर्थ संस्थेचे कार्य स्नेहपूर्ण : धारेश्वर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:31+5:302021-02-11T04:40:31+5:30
शिवसमर्थ संस्थेच्या उंब्रज शाखा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. जनार्दन बोत्रे, संचालक, सल्लागार शिवाजी सुर्वे, ...
शिवसमर्थ संस्थेच्या उंब्रज शाखा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. जनार्दन बोत्रे, संचालक, सल्लागार शिवाजी सुर्वे, हणमंत माने, देवबा वायचळ, प्रा. पी. आर. सावंत, सुदाम फिरंगे, नानासाहेब सावंत, बळवंत पाटील, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
धारेश्वर महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे एकत्रित नाव घेऊन शिवसमर्थ या नावाने असलेली संस्था प्रयत्नपूर्वक आणि पतपूर्वक चालविलेली असल्याने ती ४९ शाखांमधून कार्यरत आहे. शिवसमर्थ संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारी आहे. अत्यंत गुणी अशा प्रकारचा सेवक वर्ग आहे. ठेवीदारांच्या माध्यमातून उन्नती होत असते. आपण कधीही घेतलेली देणी देणं जमलं नाही तरी घेतलेले कर्ज राखू नये. ऋणी होऊन मरू नये. आपले काम काटेकोरपणे करा. कर्ज वेळेवर फेडा.
कार्यक्रमाची सुरुवात शिवसमर्थच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नूतन ठेवीदारांचा सत्कार धारेश्वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजीराव पवार, इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, उमेश लोखंडे, महेश्वर पाटील, अजय खडके, सुरेश काळुगडे, विजय सवादकर, विक्रम संकपाळ, सुप्रिया देसाई, शैला पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. (वा. प्र.)
फोटो : १०केआरडी०४
कॅप्शन : उंब्रज, ता. कऱ्हाड येथे शिवसमर्थ संस्थेच्या शाखेचे उद्घाटन धारेश्वर महाराजांच्या हस्ते झाले.