सोहम लावंड प्रतिष्ठानचे कार्य समाजासाठी निश्चितच आदर्शवत
By Admin | Published: September 14, 2016 09:54 PM2016-09-14T21:54:59+5:302016-09-15T00:05:51+5:30
संदीप मोझर : ट्रस्टसाठी स्वखर्चाने बांधणार एक बंधारा
खटाव : ‘खातगुण हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असले तरी या छोट्या गावात पाण्याचे महत्त्व पटवून देत असतानाच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना सर्वांमध्ये रुजवण्याचे कार्य डॉ. सोहम लावंड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांचे हे कार्य सर्वांनाच आदर्शवत आहे,’ असे प्रतिपादन संदीप मोझर यांनी केले.
खातगुण, ता. खटाव येथील डॉ. सोहम लावंड ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन सिमेंट बंधारे, दोन लुज बोल्डर, गॅबेन बंधारा यांची पाहणी करून जलपूजन केले. ट्रस्टच्या माध्यमातून गावासाठी उपयुक्त असणाऱ्या व गरज असणाऱ्या बंधाऱ्याच्या कामाचे स्वरूप पाहून भारावून गेलेल्या मोझर यांनी एक बंधारा स्वखर्चाने बांधून देण्याचे जाहीर केले.
याप्रसंगी सागर पवार, राहुल माळी, संजय गुजर, उपसरपंच रवींद्र लावंड, विवेक जाधव, रामदास वाघचौडे, अमोल जाधव, विक्रम लावंड आदींसह डॉ. सोहम लावंड प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच श्री हनुमान व्यायाम मंडळ गणेश चौक, खातगुणचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)