दोन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात होऊन काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:37+5:302021-04-15T04:38:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पळशी : माण तालुक्यातील पळशी ते पळशी फाटा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदाराने ...

Work started two years ago and is unfinished | दोन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात होऊन काम अपूर्ण

दोन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात होऊन काम अपूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पळशी : माण तालुक्यातील पळशी ते पळशी फाटा

रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदाराने संपूर्णपणे रस्ता उखडून टाकला आहे. या मार्गावर अद्यापही डांबर पडले नाही. ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारकांना रस्त्यावरून खडी तुडवत प्रवास करावा लागत आहे. रस्ता अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पळशी ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, पळशी ते पळशी फाटा हा रस्ता सातारा-पंढरपूर या राज्यमार्गाला मिळतो. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने दोन वर्षांपूर्वी रस्ता उखडून त्यावर मुरुमीकरण केले. त्यानंतर त्यावर खडीकरण करण्यात आले. मात्र, यावरच रस्त्याचे काम बंद पडले. सध्या रस्त्यावर टाकलेली खडी अस्ताव्यस्त झाली असून, ठिकठिकाणी उखडली आहे. या उखडलेल्या खडीवरून वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. कधी-कधी उखडलेल्या खडीच्या रस्त्यावरून अनेक वाहने घसरून अपघात घडले आहेत. तर धुरळ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या मार्गाची दुरवस्था झाल्याने प्रवास करताना अपघाताला निमंत्रण नको म्हणून अनेकांनी दहिवडीला येण्या-जाण्यासाठीचा मार्ग बदलला आहे. सध्या अनेकजण मनकर्णवाडीमार्गे लोधवडे फाट्यावरून जातात; तर काहीजण गावातून म्हसोबा मंदिरमार्गे मानेवस्ती ते धामणी फाटा या पर्यायी रस्त्याचा वापर प्रामुख्याने करताना दिसत आहेत. मार्ग बदलताना वाहनांना अधिक इंधन जाळावे लागत असल्याने वाहधारकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे

तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ : माण तालुक्यातील पळशी ते पळशी फाट्यापर्यंतचा रस्ता खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. (छाया : शरद देवकुळे)

Web Title: Work started two years ago and is unfinished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.