रहाटाघर येथील वीज उपकेंद्राचे काम रखडले
By admin | Published: October 1, 2014 09:27 PM2014-10-01T21:27:59+5:302014-10-01T21:27:59+5:30
महावितरण कंपनी : पावसामुळे उपकेंद्र परिसरात पाणी
कार्वे : निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो़ यावर्षीही अवेळी व मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ काकडीसह सोयाबीनचेही दर गडगडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे़
यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली़ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून बराच काळ लांबला़ परिणामी, शेतकऱ्यांची पेरणी, टोकणीचीही कामे खोळंबली़ शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली असली तरी पाऊसच नसल्याने टोकणी व पेरणीला खो बसला़ शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते़ बऱ्याच प्रतीक्षेनंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली़ त्यामुळे शेतकरी सुखावले़ त्यांची पेरणी, टोकणीची लगबग सुरू झाली़ मुसळधार पाऊस झाला नसला तरी संततधार सुरू राहिल्याने पिकांच्या पेरणी, टोकणीसाठी पोषक वातावरण तयार झाले होते़ अशातच पावसाचा मुक्काम लांबला़ त्यामुळे शेतात पाणी साचले़ सोयाबीनसह अनेक पिके पाण्याखाली बुडाली़ काकडीची फुलकळी झडली़ तसेच मुळ्याही कुजल्या़ त्याचा फटका उत्पन्नावर झाला़ शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही़ मोठ्या क्षेत्रातूनही अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले़ सुरुवातीला काकडीचा दर चांगला होता़ मात्र, काही दिवसांतच दर कमी झाला़ सोयाबीनचीही हीच अवस्था झाली़ अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून सोयाबीनची लागवड केली़ त्याला खत, पाण्याचे नियोजन केले़ मात्र, एवढे करूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकातून कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले़ (वार्ताहर)
उत्पादनापेक्षा बियाणाचा खर्च तिप्पट
जून, जुलै महिन्यांत सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना त्याचा दर पाहून शेतकऱ्यांना अक्षरश: घाम फुटला होता़ सोयाबीनच्या बियाणाचा दर प्रतिकिलो १०० रुपये एवढा होता़ म्हणजे बियाणाचा दर प्रतिक्विंटल दहा हजार रुपये होता़ मात्र, एवढे महाग बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला फक्त तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय़ व्यापारी शेतकऱ्यांकडून फक्त तीस रुपये किलोने सोयाबीन खरेदी करतायत़