साताऱ्यात मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:28+5:302021-01-04T04:31:28+5:30

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या एका कंपनीच्या सेल मोल्डिंग मशीनवर काम करत असताना त्यामध्ये अडकून एका कामगाराचा ...

Worker dies after getting stuck in a machine in Satara | साताऱ्यात मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

साताऱ्यात मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Next

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या एका कंपनीच्या सेल मोल्डिंग मशीनवर काम करत असताना त्यामध्ये अडकून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

उमेश मुगूटराव पवार (वय ५५, रा. नलवडेवाडी, ता. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औद्योगिक वसाहतीमधील संग्राम इंटरप्रायझेस कंपनीत सेल मोल्डिंग मशीनवर उमेश पवार हे काम करत होते. यावेळी ते अचानक मशीनमध्ये अडकले आणि बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी दिली. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून हवालदार जाधव हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Worker dies after getting stuck in a machine in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.