कामगार खून प्रकरण: माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जामीन अर्ज मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 03:51 PM2022-03-15T15:51:03+5:302022-03-15T15:51:32+5:30
खटाव-माण ॲग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मारहाणीतील मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक झाली होती.
वडूज : पडळ (ता. खटाव) येथील खटाव-माण ॲग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मारहाणीतील मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक झाली होती. त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयात मंजूर झाला.
याबाबत माहिती अशी की, जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांच्या मृत्यूप्रकरणी वडूज पोलिसांत २० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी सात ते आठ आरोपींना वडूज पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. प्रभाकर घार्गे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. मृणाल बुवा व ॲड. धैर्यशील साळुंखे यांनी काम पाहिले.