विकासकामे दर्जेदार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:16+5:302021-08-22T04:41:16+5:30
पुसेगाव : ‘राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागात भरीव विकासकामांना सुरुवात झाली आहे. मात्र, जनतेच्या हिताच्या दृष्टीने ही विकासकामे दर्जेदार ...
पुसेगाव : ‘राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागात भरीव विकासकामांना सुरुवात झाली आहे. मात्र, जनतेच्या हिताच्या दृष्टीने ही विकासकामे दर्जेदार व अधिक उत्तम प्रकारची होण्यासाठी गावपातळीवर कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे’, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
खटाव उत्तर तालुक्यातील पुसेगाव तसेच खातगुण येथे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुनीता कचरे यांच्या फंडातून ३ कोटी ६ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष संतोष जाधव, माजी उपसभापती संतोष साळुंखे, राजेंद्र कचरे, संतोष तारळकर, गणेश जाधव, राम जाधव, बाळासाहेब जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादीचे पुसेगाव शहर तसेच खातगुण येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, खातगुण - जाखणगाव रोड डांबरीकरण, खातगुण ग्रामपंचायत इमारत, पाणी पुरवठा विहिरीवरील नवीन डीपी, स्मशानभूमी नूतनीकरण, खातगुण अंतर्गत डांबरी रोड - सिमेंट रोड अंतर्गत गटारे अशा सार्वजनिक कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुसेगाव येथील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालय परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण, वडूज रोड येथील रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी इमारत, अंतर्गत गटारे आदी विविध सार्वजनिक कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
२१ पुसेगाव
फोटो-
खातगुण (ता. खटाव) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
(छाया : केशव जाधव)