ऑक्सिजन पुरविणारे अजूनही सोसत आहेत घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:26+5:302021-04-28T04:43:26+5:30
जगभर कोरोनाने हाहाकार माजविला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने, अनेक रुग्ण जीव गमावत आहेत. ऑक्सिजन मिळविण्यासाठी नातेवाइकांना दाहीदिशा एक ...
जगभर कोरोनाने हाहाकार माजविला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने, अनेक रुग्ण जीव गमावत आहेत. ऑक्सिजन मिळविण्यासाठी नातेवाइकांना दाहीदिशा एक कराव्या लागत आहेत, तरीही फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना मात्र अजूनही कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागत आहेत. विशेष म्हणजे, हे झाड साताऱ्यातील राधिका रस्त्यावर असलेल्या एका दवाखान्याच्या परिसरात आहे. (छाया : जगदीश कोष्टी)
०००००००००००
चौकोन अजूनही गायब
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव गेल्या वर्षी झाला. तेव्हा दुकानांसमोरील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जावे, यासाठी दुकानांसमोर ठरावीक अंतरावर चौकोन करण्यास सांगितले होते. तसे आखलेही होते. मात्र, ते आता गायब झाले आहेत.
०००००
वडूज परिसरात अर्धा तास मुसळधार पाऊस
वडूज : वडूज परिसरात दोनपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्या अंदाजानुसार खटाव तालुक्यातील खटाव येथे दुपारी सुमारे एक तास तर वडूज येथे सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडल्याने हवेत गारठा जाणवू लागला आहे.
००००००
एटीएममध्ये दुर्लक्ष
सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, ई-पेमेंट करण्यावर भर देण्याचे आवाहन केले जात असले, तरी सातारकर एटीएमचा वापर करत आहेत. मात्र, त्या ठिकाणी सॅनिटायझरची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे.
००००००००
आशा स्वयंसेविका ठरत्यात मार्गदर्शक
वडूज : खटाव तालुक्यातील होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक घरभेटी देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करीत आहेत. या पथकातील आशा स्वंयसेविका दररोज भेटी देऊन रुग्णांना दिलासा देत काळजीही घेताना आढळून येत आहेत, तर दररोज मोबाइलवरून थेट बाधितांशी संपर्क साधत कोणता त्रास होतोय का, असल्यास तातडीने औषधे पोहोच करीत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांना आशा स्वयंसेविका मार्गदर्शक ठरत आहेत.
-----------
क्रीडांगणेही ओस
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. साहजिकच शहरातील क्रीडांगणे ओस पडत आहेत. या ठिकाणी कोणीही खेळायला येत नाहीत.
०००००
वेगळा फोटो
वादळी पावसाने झाडाच्या फांद्या पडल्या
वाईच्या पूर्व भागात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी गारपीटही झाल्याने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. वाई ते पाचवड रस्त्यावर शंकरनगर ते आसलेदरम्यान झाडे पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यातूनच काही जण जीव धोक्यात घालून प्रवास करत होते.
वेगळा फोटो पांडुरंग भिलारे यांनी सोमवारी मेल केला आहे.