दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयात क्ष किरण मशिन कार्यान्वीत

By admin | Published: July 16, 2017 04:40 PM2017-07-16T16:40:48+5:302017-07-16T16:40:48+5:30

गरीब रुग्णांची मोठी सोय : डॉक्टरांची संख्या वाढविण्याची मागणी

X-ray machine installed in Dahivadi rural hospital | दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयात क्ष किरण मशिन कार्यान्वीत

दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयात क्ष किरण मशिन कार्यान्वीत

Next


आॅनलाईन लोकमत

दहिवडी (जि. सातारा), दि. १५ : दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नवीन क्ष किरण मशीन सुरू केल्याने गोरगरीब रुग्णांची मोठी सोय झाली आहे. रुग्णालयात आता क्ष किरण मोफत काढता येणार आहेत. यामुळे दहिवडी रुग्णालयाचे रुपडे पालटणार आहे. दरम्यान, विविध मान्यवरांच्या हस्ते नवीन क्ष किरण मशीनचे उद्घाटन करण्यात आले. येथे एकच डॉक्टर कार्यरत आहेत. डॉक्टर संख्या वाढवावी, अशी मागणीही यावेळी व्यक्त करण्यात आली.


दहिवडी, ता. माण येथील ग्रामीण रुग्णालयातील क्ष किरण मशिनरीच्या उदघाटनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, अ?ॅड. भास्करराव गुंडगे, माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, नगराध्यक्षा साधना गुंडगे, डॉ. संजय देशमुख, डॉ. चंद्रशेखर हनगंडी, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, डॉ. समीर तांबोळी, डॉ. समीना तांबोळी, डॉ. अरुण पाटील, डॉ. प्रदीप पालवे, सोमनाथ भोसले, विशाल बागल आदी उपस्थित होते.


आमदार गोरे म्हणाले, ह्यगोरगरीब जनतेला आरोग्यासंदर्भात तत्काळ सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅनसारख्या मशिनरी नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयात सुविधांची वाणवा बघायला मिळत आहे. शासनाने या सुविधा पुरवाव्यात यासाठी येत्या अधिवेशनात हे प्रश्न मांडणार आहे.


दहिवडी ग्रामीण रुग्णालयात क्ष किरण मशीन सुरु झाल्याने गोरगरीब पेशंटना दिलासा मिळाला आहे, सामन्यांसाठी अशा सुविधा उपलब्ध झाल्यास आर्थिक बचत होईल. शासन ग्रामीण रुग्णालयात सेवासुविधा पुरवत नसल्याने तसेच पुरेसा स्टाफ नसल्याने सामान्यांना खासगी दवाखान्याचा रस्ता धरावा लागत आहे. शासनाने १०८ अ?ॅम्बुलन्सची चांगली सेवा दिली आहे. अपघात झाल्यानंतर या अ?ॅम्बुलन्स तत्काळ हजर होत असतात. त्यामुळे अपघातातील अनेक जखमींचे प्राण वाचले आहेत, असेही ते म्हणाले. डॉ. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनोज कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: X-ray machine installed in Dahivadi rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.