वाई वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रतिबंधित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:41 AM2021-04-28T04:41:56+5:302021-04-28T04:41:56+5:30

वाई : वाई शहरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर मंगळवारी रात्रीपासून ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर केले आहे. शहरात कोरोना ...

Y restricted area due to increasing number of patients | वाई वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रतिबंधित क्षेत्र

वाई वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रतिबंधित क्षेत्र

Next

वाई : वाई शहरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर मंगळवारी रात्रीपासून ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर केले आहे. शहरात कोरोना उपाययोजनांच्या आढाव्यासाठी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या वेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, गटविकास अधिकारी उदयकुमार कसुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव आदी उपस्थित होते.

वाई शहरात दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. शहरात भाजी, किराणा माल व औषधासाठी मिळणाऱ्या शिथिलतेचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर गर्दी करीत आहेत. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरात सूक्ष्म लक्षणे असलेले, उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. त्यातील काही रुग्ण बाहेर फिरत असल्याने रुग्णवाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ४२ प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आल्याचे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी सांगितले. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

त्यावर ताबडतोबीने कार्यवाही करण्याची सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली. मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांचा समन्वय ठेवावा. नगरसेवकांच्या मदतीने प्रतिबंधित क्षेत्राचे नागरिकांना त्रास होणार नाही असे नियोजन करावे, असे सुचविले. घरपोहोच साहित्य मिळण्याची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य देण्यासही सांगितले.

नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, चरण गायकवाड, दीपक ओसवाल, महेंद्र धनवे, राजेश गुरव, भारत खामकर, रूपाली वनारसे यांनी चर्चेत भाग घेतला. या वेळी प्रदीप जायगुडे, युगल घाडगे, मामा देशमुख आदी उपस्थित होते.

तापोळा, महाबळेश्वर, डॉन ॲकॅडमी, बेल एअर हॉस्पिटल, वाईतील तीन खासगी रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय तसेच खंडाळा तालुक्यातही शासकीय व खासगी ठिकाणी उपचार सुरू आहेत. रुग्णालये अधिग्रहित केली असून, यंत्रणा उभारली आहे. वाईतील किसन वीर महाविद्यालयात विलगीकरण कक्ष सुरू झाला आहे. कवठे उपकेंद्र व मॅप्रो आय हॉस्पिटलमधील यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ते एक-दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे आपल्या भागात अतिदक्षता विभाग, प्राणवायू खाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. येथील प्राणवायू पुरवठा सुरळीत व नियमित राहण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. डॉक्टर, परिचारिका, सेवक, तंत्रज्ञ यांची उपलब्धता करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

चौकट :

आमदार मकरंद पाटील यांची मध्यस्थी

शहरात वाढत्या कोरोना संसर्गावर उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांची बैठक झाली. मात्र बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील मिळू शकला नाही.

छायाचित्रात :

पांडुरंग भिलारे यांनी सोमवारी फोटो मेल केला आहे.

वाई येथे झालेल्या बैठकीत आमदार मकरंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत आणि मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ उपस्थित होत्या. (छाया : पांडुरंग भिलारे)

Web Title: Y restricted area due to increasing number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.