वाई तालुका शंभर टक्के बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:38 AM2021-04-11T04:38:35+5:302021-04-11T04:38:35+5:30
वाई : जिल्हा प्रशासनाने वीकेंड लॉकडाऊन कडक जाहीर केल्याने वाई तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून बंद पाळण्यात ...
वाई : जिल्हा प्रशासनाने वीकेंड लॉकडाऊन कडक जाहीर केल्याने वाई तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून बंद पाळण्यात आला. तालुक्यात कोरोनाबाधित आकडा ९०० पार गेला असून, कोरोना एप्रिलमध्ये फक्त ४६० रुग्ण सापडले असून, १६० जणांना आपला जीव गमवावा लागल्याने कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने पसरत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
जीवनावश्यक व्यवहार सोडले तर लागण होण्याच्या भीतीने स्वत:हून अनेक व्यावसायिकांनी आपले धंदे बंद ठेवले आहेत. याचा परिणाम शहरासह ग्रामीण भागातसुद्धा जाणवू लागला आहे. हॉटेल्स, मॉल, सिनेमा गृह, सार्वजनिक कार्यक्रम, आठवडे बाजार, मिठाईची दुकाने, दारूची दुकाने, कपड्याची दुकाने, सेतू कार्यालय, रजिस्टर ऑफिस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. वाई पोलीस ठाण्यावर तर कोरोनाचे आक्रमण झाले असून, पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
वाई शहरात सकाळपासूनच सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले, शहराच्या मुख्य चौकात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. कोणावरही दबाव आणावा लागला नाही, तरीही शहरातील मुख्य चौकांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, बाहेरून येणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत होती.
काही कंपनीनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शुक्रवारी रात्रीपासून कंपनी पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, तर अनेक कंपन्यांचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालू आहे.
वाई शहरातून रिक्षातून व पोलीस गाडीतून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत होत. मुंबईहून गावी येणाऱ्यांची संख्या प्रचंड दिसली. परंतु, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तपासणीची कोणतीही काळजी घेतली नाही.
वाईतून नागरिक मास्क न घालणे, डबल सीट जाणारे, अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. वाई शहराच्या चारही दिशेला चेक पोस्ट तयार करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.