वाईचा सायकलपटू प्रसाद एरंडेची गिनीज बुकमध्ये नोंद

By admin | Published: March 11, 2015 09:47 PM2015-03-11T21:47:45+5:302015-03-12T00:09:53+5:30

देशांतर्गत सायकल स्पर्धेत विक्रम : ‘किसन वीर’तर्फे सत्कार

Yacht cyclist Prasad Erandhey recorded in the Guinness Book | वाईचा सायकलपटू प्रसाद एरंडेची गिनीज बुकमध्ये नोंद

वाईचा सायकलपटू प्रसाद एरंडेची गिनीज बुकमध्ये नोंद

Next

भुर्इंज : एकशे चाळीस दिवसात देशांतर्गत सुमारे पंधरा हजार किलोमीटर सायकलने प्रवास करून विक्रम केलेल्या वाईतील प्रसाद एरंडेची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या विक्रमातून वाईचे नांव जगाच्या नकाशावर कोरणाऱ्या प्रसाद एरंडे याचा किसन वीर साखर कारखाना परिवाराकडून कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.प्रसाद एरंडे यांची जागतिक सायकल स्पर्धेसाठी गेल्या मार्चमध्ये निवड झाली होती. या स्पर्धेसाठी जगातील सहासायकलपट्टंूसमवेत निवड होणारा प्रसाद एरंडे हा महाराष्ट्र-भारतातील एकमेव स्पर्धक होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे जागतिक सायकल स्पर्धेची संधी हुकल्यामुळे त्याने देशांतर्गत सायकल स्पर्धेमध्ये विक्रम करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. प्रसादची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती पाहता सायकल खरेदीसाठी येणारा एक लाख रूपयांचा खर्च, जगाच्या नकाशावर वाईचे नाव कोरण्याची प्रसादची धडपड आणि त्याची प्रबळ इच्छाशक्तीचा विचार करून मदन भोसले मित्र मंडळाने त्याला कार्बन फायबरची सायकल उपलब्ध करून दिली होती.मदन भोसले यांच्या पुढाकारातून महागडी सायकल उपलब्ध झाल्यामुळेच देशांतर्गत सायकल स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या माझ्या स्वप्नाला गती मिळाली. त्याचबरोबर कुटुंब आणि मित्रांचा आशिर्वाद व सहकार्य मिळाले. आई-वडिलांनी स्वप्न पाहिले आणि मी ते सत्यात उतरविले. या स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढल्याचे नमुद करून एरंडे याने सायकल प्रवासादरम्यान मिल्का सिंंग आणि राहुल द्रविडची झालेली भेट मला पुढील सायकल प्रवासासाठी उपयोगी पडल्याचे सांगितले. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सतिश भोसले, उद्योगपती जे. के. पाटील यांनीही आपल्या मनोगतात प्रसाद एरंडेच्या याच्या विक्रमाचे कौतुक करून त्याच्या पाठीशी मदन भोसले मित्र मंडळ उभा असल्याचे सांगितले.यावेळी प्रसादची आई मंगल एरंडे यांचा कारखान्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कोरेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य नवनाथ केंजळे, काँग्रेसचे वाई तालुका संघटक शेखर पाटील, एन. एन. काळोखे, एन. बी. पाटील, एस. एल. कुलकर्णी, विठ्ठलराव कदम, आर. जे. सणस, एच. एच. पाटील, रोहित ठिगळे, रिया अत्तार, शिवाजी देसाई, पंढरीनाथ घाटे, महेश जोशी, दादासाहेब शिंदे, अतुल सपकाळ, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Yacht cyclist Prasad Erandhey recorded in the Guinness Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.