येराडच्या येडाबाची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:58+5:302021-04-18T04:38:58+5:30
कोयनानगर : येडोबा यात्रेचा मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडली आहे. त्याचपद्धतीने चालूवर्षी ...
कोयनानगर
: येडोबा यात्रेचा मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडली आहे. त्याचपद्धतीने चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द यात्राही प्रशासनाच्या कारवाईचा डाग न लागता पार पाडावी,’ असे आवाहन तहसीलदार योगेश टोम्पे यांनी केले.
बनपेठ-येराड (ता. पाटण) येथील येडोबा देवाच्या यात्रा नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष सदानंद साळुंखे, सरपंच आबासो साळुंखे, प्रकाश साळुंखे, उपसरपंच नीलेश साळुंखे, यशवंत जाधव, राजेंद्र पुजारी, पोलीस पाटील रवींद्र साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे, प्रकाश साळुंखे, भरत पुजारी, विठ्ठल पुजारी, बळीराम साळुंखे, पंढरीनाथ साळुंखे, अनिल साळुंखे, हणमंत साळुंखे, सीताराम साळुंखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.