निराधारांना आधार देण्याचे ‘यशोधन’चे काम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:42 AM2021-08-24T04:42:43+5:302021-08-24T04:42:43+5:30
वाई : ‘गेली अनेक वर्षे बोडके दाम्पत्य सेवाभावी वृत्तीने समाजातील निराधार महिला, पुरुष यांना सहारा देत आहे. अनेकांना त्यांच्या ...
वाई : ‘गेली अनेक वर्षे बोडके दाम्पत्य सेवाभावी वृत्तीने समाजातील निराधार महिला, पुरुष यांना सहारा देत आहे. अनेकांना त्यांच्या नातेवाईकांशी भेट घालून देत आहे. यशोधन ट्रस्ट समाजातील अनाथ, बेघर मनोरुग्णांसाठी काम करत आहे. निराधारांना आधार देण्याचे यशोधन ट्रस्टचे काम कौतुकास्पद आहे’, असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.
यशोधन ट्रस्टने बांधलेल्या महिलांच्या विस्तारित कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘यशोधन ट्रस्टमुळे वाई आणि वेळेचे नाव महाराष्ट्रात पोहोचले असून, संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. संस्थेने या क्षेत्रात भरारी घेतली आहे.’
संस्थेचे अध्यक्ष रवी बोडके यांनी प्रास्ताविक केले. संचालिका सोनल बोडके यांनी स्वागत केले. यावेळी जय हिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप माने, महादेव मस्कर, शशिकांत पवार, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, पंचायत समिती सदस्य अनिल जगताप, माजी सभापती वामनराव जमदाडे, सरपंच रफिक इनामदार, उपसरपंच संतोष नलावडे आदी उपस्थित होते.