मायणीच्या यशवंतबाबा महाराज रथोत्सवास प्रारंभ, हजारो भाविक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:32 PM2018-03-13T13:32:10+5:302018-03-13T13:32:10+5:30
खटाव तालुक्यातील मायणी येथील यशवंतबाबा महाराज यांचा रथोत्सवास मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यासह जिल्हाबाहेरुन हजारो भाविक दाखल झाले आहेत.
मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथील यशवंतबाबा महाराज यांचा रथोत्सवास मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यासह जिल्हाबाहेरुन हजारो भाविक दाखल झाले आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत, यशवंतबाबा देवस्थानचे विश्वस्त व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सकाळी रथपूजन करण्यात आले.
दरवर्षी धुलिवंदनपासून येथील यशवंतबाबा महाराज यांची रथोत्सव यात्रेस सुरुवात होते. यात्रेसाठी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील जनावरांचे मोठे व्यापारी हजेरी लावतात. त्यामुळे ही यात्रा जनावरांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
यात्रेनिमित्ताने खेळणी, मेवा मिठाईची दुकाने थाटली आहेत. पूजन झाल्यानंतर रथाची मिरवणूक सुरू झाली. मुख्य एसटी स्टँड मार्गे बाजार पेठेतून भारत मराठी शाळा, चाँदणी चौक, वडुजरोड, खंडोबामाळ आदी ठिकाणी रथ जाणार आहे .
रथोत्सवासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा कमिटी तसेच जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविल्या आहेत. तसेच सातारा, वडूज, दहिवडी येथून एसटीच्या फेऱ्यांही वाढविण्यात आल्या आहेत.