साताऱ्यातील यशवंत उद्यानाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:20+5:302021-04-13T04:37:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील यशवंत उद्यानाचे पालिकेकडून सुशोभिकरण केले जाणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील यशवंत उद्यानाचे पालिकेकडून सुशोभिकरण केले जाणार आहे. या कामास प्रारंभ झाला असून, सोमवारी पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी यशवंत उद्यानाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
यशवंत उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीदिनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी या उद्यानात येत असतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देऊ नका, अशा सूचना सीता हादगे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. तर बांधकाम सभापती सिद्धी पवार मयांनी उद्यानातील कारंजे लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत, अशी सूचना केली.
नागरिकांना बसण्यासाठी गार्डन बेंच, पेवर ब्लॉक, पिण्याचे पाणी ही कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी सर्व कामे मार्गी लावली जाणार आहेत. यावेळी यशवंत उद्यानात असणाऱ्या वाचनालयाची पाहणी करण्यात आली. या वाचनालयाची डागडुजी व रंगरंगोटी करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला करण्यात आल्या. यावेळी रत्नाकर वडई, लिपीक नंदकुमार कांबळे, संतोष अवघडे आदी उपस्थित होते.