यशवंतराव-प्रेमलाकाकींनी रोखला जनता पक्षाचा वारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:46 PM2019-03-17T22:46:41+5:302019-03-17T22:46:47+5:30

आ णीबाणीनंतरच्या काळानंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन मंत्री संजय गांधी यांना पराभवाला सामोरे ...

Yashwantrao-Pehalakakki wins from the Janata Party | यशवंतराव-प्रेमलाकाकींनी रोखला जनता पक्षाचा वारू

यशवंतराव-प्रेमलाकाकींनी रोखला जनता पक्षाचा वारू

Next

आ णीबाणीनंतरच्या काळानंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन मंत्री संजय गांधी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. जनता पक्षाचा उधळलेल्या वारुने देशभर काँगे्रसला जोरदार धक्के दिले; परंतु सातारा व कºहाड लोकसभा मतदारसंघ मात्र त्याला अपवाद ठरले. सातारा लोकसभा मतदारसंघात दिवंगत यशवंतराव चव्हाण व कºहाड लोकसभा मतदारसंघात दिवंगत प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे या दोन्ही मतदारसंघांत जनता पक्षाला शिरकाव करता आला नाही.
१९७५ ची देशभर लागू करण्यात आलेली आणीबाणी काँगे्रसला भलतीच महागात पडली. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली अनेक चळवळी झाल्या. याला मोठा लोकसहभाग मिळाला. आणीबाणीविरोधात ज्या पद्धतीने लोक एकत्र आले, त्याच पद्धतीने सातारा व कºहाड मतदारसंघांतही आणीबाणीच्या विरोधात आंदोलने झाली. इंदिरा गांधींच्या विरोधात जनमत उसळून आले होते. मात्र, त्याची राजकीय झळ कुठल्याही पद्धतीने जिल्ह्याच्या राजकारणात अग्रेसर असणाऱ्या काँगे्रस पक्षाला बसली नाही.
जयप्रकाश नारायण, चरणसिंग यांच्या नेतृत्वाला देशभर पाठबळ मिळाले. सातारा जिल्ह्यातही त्याला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्याचे रुपांतर निवडणुकीत विजय मिळविण्यात झाले नाही. दोन वर्षांनंतरच म्हणजे १९७७ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. या निवडणुकीत इंदिरा गांधींना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. या निवडणुकीत काँगे्रसचे साताऱ्यातील दोन्ही गड अभेद्य ठरले.
१९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा मतदारसंघातून काँगे्रसने यशवंतराव चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. जनता पक्षाने त्यांच्याविरोधात सुशिक्षित उमेदवार डॉ. नितीन लवंगारे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याव्यतिरिक्त आणखी दोघांनी उमेदवारी केली होती. डॉ. लवंगारे हे सुशिक्षित उमेदवार असल्याने तसेच देशभर उसळलेल्या काँगे्रसविरोधी लाटेमुळे यशवंतराव चव्हाण यांचा पराभव होणार, असा प्रचार त्या काळात केला गेला. विरोधकांनी ताकद लावूनही यशवंतराव चव्हाण यांची लोकप्रियता कमी झाली नाही. या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण २ लाख ६0 हजार ५६२ मते मिळवून विजयी झाले. तर डॉ. लवंगारे यांना ६८ हजार ९६१ मते मिळाली. इतर दोन उमेदवारांना तीन आकडी मतदानात समाधान मानावे लागले.
कºहाड लोकसभा मतदारसंघात काँगे्रसने प्रेमलाकाकी चव्हाण यांनाच उमेदवारी दिली. या मतदासंघात जनता पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. काँगे्रसचा परंपरागत विरोधी शेतकरी कामगार पक्षातर्फे बी. बी. देसाई यांना उमेदवारी दिली. अन्य दोन अपक्ष उमेदवारांनीही या निवडणुकीत नशीब आजमावले. या निवडणुकीत प्रेमलाकाकींना २ लाख ४२ हजार ३0५ मते मिळाली. तर बी. बी. देसाई यांना ७२ हजार ४९0 मते मिळाली. शेकापला या निवडणुकीतही विजय मिळवता आला नाही.
दरम्यान, देशभर काँगे्रसविरोधकांनी जोरदार वातावरणनिर्मिती केली असताना सातारा व कºहाड लोकसभा मतदारसंघात काँगे्रस अभेद्य राहिली. प्रत्यक्ष इंदिरा गांधींनाही पराभवाला सामोरे जावे लागले असताना यशवंतरावांची लोकप्रियता दुपटीने वाढली.
- सागर गुजर

Web Title: Yashwantrao-Pehalakakki wins from the Janata Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.