यवतेश्वर घाटात कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:12+5:302021-06-18T04:27:12+5:30
पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात गुरूवारी सकाळी मुसळधार पावसाने तीन ठिकाणी दरड कोसळली. ही दरड ...
पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात गुरूवारी सकाळी मुसळधार पावसाने तीन ठिकाणी दरड कोसळली. ही दरड रस्त्यालगत कोसळल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. परंतु, काही ठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या चरी बुजल्याने रस्त्यावर पाणी, माती, बारीक दगड आले. त्यामुळे जेसीबीद्वारे चरी मोकळ्या करण्याचे काम सुरू होते.
सातारा शहराच्या पश्चिम भागात असणाऱ्या यवतेश्वर परिसरात दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. सततच्या पावसाने घाटात तीन ठिकाणी लहान-मोठया स्वरूपात मुरूम, माती, दगड अशाप्रकारच्या दरडी रस्त्यालगतच्या चरीत पडल्या. काही ठिकाणी तुरळक स्वरूपात मोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अडचणीचे झाले होते. दरम्यान, सायंकाळपर्यंत रस्त्यातील दरड हटविण्यात आली.
दरवर्षी, यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वारंवार घडत असते. सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळत आहेत. घाटात डोंगरालगत असुरक्षित ठिकाणी उभे राहून काही पर्यटक फोटो सेशन करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे धोकादायक ठरू शकते.
फोटो दि. १७ पेट्री यवतेश्वर फोटो...
फोटो ओळ : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. (छाया : सागर चव्हाण )