यवतेश्वरच्या रहदारीचा भार ब्रिटिशकालीन भिंतीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:13 PM2017-12-29T23:13:41+5:302017-12-29T23:14:45+5:30
जावेद खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहराच्या पश्चिमेला निसर्ग सौंदर्याने नटलेला कास पठार आहे. या ठिकाणी निसर्ग न्याहळण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक येत असतात. तसेच शहराला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. अनेक ठिकाणी इतिहासाची आठवण करून देणाºया वास्तूही पाहायला मिळतात.
ऐन पावसाळ्यात यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने हा मार्ग रहदारीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. दरम्यान, कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू असतानाच पावसाच्या पाण्याने रस्ता खचला गेला. जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने परराज्यातून येणाºया पर्यटकांचा हिरमोड झाला. कास पठाराला जाण्याचा मुख्य निम्मा रस्ता खचला तरी बाकीचा रस्ता रहदारी करण्यास धोका नव्हता, याचेच कारण म्हणजे या ठिकाणी असलेली ब्रिटिशकालीन दगडी भिंत. या दगडी भिंतीमुळे उर्वरित रस्ता शाबूत राहिला असून, लहान वाहनांसाठी वाहतूक सुरूच ठेवली.
यवतेश्वर मार्गावरील पावसाच्या पाण्याने हा रस्ता खचला होता. पाच मीटर रुंदीचा हा रस्ता जवळपास दीड मीटरने खचल्याने राहिलेल्या साडेतीन मीटर रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक होते; परंतु याच ठिकाणी ब्रिटिशकालीन दगड-मातीची दहा ते पंधरा फूट खोल भिंत असल्याने उर्वरित रस्ता व्यवस्थित राहिला
आहे. त्यामुळे संबंधित विभागाने खचलेल्या रस्त्याची पाहणी करून एकेरी वाहतूक सुरुवात करण्यात आली. सध्या येथे भराव टाकण्याचे काम सुरू आहे. येथे काम करणारे कामगार व कर्मचारी अधिकारी वर्गानही ब्रिटिशकालीन भिंतीमुळेच हा रस्ता राहिला असून, सध्या येथून होणाºया रहदारीलादेखील कोणताच धोका नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
ऐन हंगामात पर्यटकांची पायपीट..
ज्यावेळी हा रस्ता खचला, त्यावेळी खबरदारी म्हणून संपूर्ण रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. यावेळी परराज्यातून आलेल्या पर्यटकांना पायपीट करून कास पठाराचे दर्शन घ्यावे लागत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या ठिकाणी पाहणी केली असता निम्मा रस्ता सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. पावसाच्या पाण्याने चिखल वाहून गेल्याने याठिकाणी ब्रिटिशकालीन भिंत असल्याने हा रस्ता वाहतुकीला कोणताच धोका नसल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.