यंदा चॉकलेट, क्विलिंग अन् एलईडी राखींचा थाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 04:32 PM2017-08-05T16:32:29+5:302017-08-05T16:34:46+5:30

सातारा : फुटबॉल खेळणारा लायटिंगवाला बाल गणेश, पेपर क्विलिंगच्या फुलांच्या आकाराची अन् रेशीम धाग्यावर ऐटित बसलेले चॉकलेट... हा प्रकार काय असे क्षणभर वाटण्याची शक्यता आहे... पण हे सर्व प्रकार आहेत सातारच्या बाजार पेठेत दाखल झालेल्या हटके राखींचे!

This year, Chocolate, Quiling and LED Rakhi! | यंदा चॉकलेट, क्विलिंग अन् एलईडी राखींचा थाट!

यंदा चॉकलेट, क्विलिंग अन् एलईडी राखींचा थाट!

Next
ठळक मुद्दे सातारच्या बाजार पेठेत बहिणींची क्रिएटिव्हीटीस्वनिर्मितीच्या आनंदाबरोबरचं बाजारपेठेत शेकडो पर्याय उपलब्धहटके राखी घेण्यासाठी बाजारपेठ पालथी

सातारा : फुटबॉल खेळणारा लायटिंगवाला बाल गणेश, पेपर क्विलिंगच्या फुलांच्या आकाराची अन् रेशीम धाग्यावर ऐटित बसलेले चॉकलेट... हा प्रकार काय असे क्षणभर वाटण्याची शक्यता आहे... पण हे सर्व प्रकार आहेत सातारच्या बाजार पेठेत दाखल झालेल्या हटके राखींचे! 

बहिण भावाचा पवित्र रक्षा बंधन. या सणासाठी आवश्यक असणारी राखी म्हणजे रेशमचा दोरा ही संकल्पना आता बरीच मागे पडली आहे.

गतवर्षी प्रमाणेच यंदाही बहिणींचा राखीचा ट्रेण्ड लक्षात घेवुन बाजारपेठेत एकसेएक राखी दाखल झाल्या. यात चिमुकल्यासंह मोठ्यांच्या पसंतीस उतरल्या त्या चॉकलेट, क्विलिंग आणि एलईडी या राखी.

बहिणीही हिरीरीने इतरांपेक्षा हटके राखी घेण्यासाठी बाजारपेठ पालथी घालत आहेत. काहींनी तर चक्क भावाला आवडेल अशा रंगांमध्ये घरातच राखी तयार केली आहे.

Web Title: This year, Chocolate, Quiling and LED Rakhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.