यंदाची जिलेबी गोडच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:14 AM2017-08-15T00:14:18+5:302017-08-15T00:14:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीने अस्थिर झालेल्या बाजारपेठेला सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील बहुतांश व्यापाºयांनी जिलेबीच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची जिलेबी गोडच राहणार यात शंका नाही.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरातील मुख्य चौकांबरोबरच गल्लो-गल्लीत जिलेबी दुकाने थाटण्यात आली आहेत. परस्परांच्या घरी जिलेबी देण्याची अनोखी पध्दत यंदाही पाहायला मिळणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातारा शहरात एका व्यावसायिकाने मुख्य चौकात जिलेबी वाटून स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला होता. तेव्हापासून सातारकरांनी ही परंपरा अखंडित सुरू ठेवली आहे. ध्वजवंदना झाल्यानंतर मित्र आणि आप्तेष्टांकडे जिलेबी घेऊन जाण्याची प्रथा अद्यापही सुरूच आहे.
सातारा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त चारशेहून अधिक दुकाने आणि स्टॉल जिलेबी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सुमारे आठ दिवसांपासून जिलेबीचे पीठ भिजत घातले जाते. त्यानंतरच उत्कृष्ट प्रतीची जिलेबी बनले. एका दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सातारा शहराच्या बाजारपेठेत पाहायला मिळते.
अन्य पदार्थांकडे दुर्लक्ष
स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सातारकर मोठ्या प्रमाणात जिलेबीची खरेदी करतात. त्यामुळे अन्य अन्न पदार्थांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन दिवसांत साताºयात वडापावची विक्रीही मंदावलेली असते. त्यामुळे अनेक वडापाव विक्रेतेही या दिवशी जिलेबी तयार करून विकतात.