येरळातीरी वृक्षसंवर्धनामुळे प्रयास सामाजिक संस्थेचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:07+5:302021-07-16T04:27:07+5:30
वडूज : येथील प्रयास सामाजिक विकास संस्थेने गत चार वर्षांपूर्वी विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे योग्य संवर्धन केले आणि ...
वडूज : येथील प्रयास सामाजिक विकास संस्थेने गत चार वर्षांपूर्वी विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे योग्य संवर्धन केले आणि त्या वृक्षांचा पाचवा वाढदिवस साजरा करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला असून वडूज परिसरातील येरळा नदीकाठी वृक्षसंवर्धनामुळे प्रयास सामाजिक संस्थेने कवच निर्माण केले आहे,’ असे प्रतिपादन माजी सभापती संदीप मांडवे यांनी केले.
या वेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे, डाॅ. कुंडलिक मांडवे, प्रा. सोहन मोहळकर, मुन्ना मुल्ला, रोहित शहा, सचिन माळी, संतोष देशमाने, जयवंत पाटील, महेश गोडसे, ईश्वर जाधव, धनंजय गोडसे, शुभम ठिगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, ‘संस्थेने समाजमन व संभाव्य धोके ओळखून आपले समाजाप्रति कार्य अविरत प्रामाणिक सुरू ठेवले आहे. त्यांनी समाजासाठी विविध प्रश्न हाती घेऊन चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्यात वेगळा ठसा उमटवला आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी येरळानदीचे पात्र साफसफाई करून बंधारा बांधण्याच्या कामात मोलाचे सहकार्य केले.’
याप्रसंगी शशिकांत गोडसे, राजेंद्र दारवटकर, मयूरेश शेटे, हवालदार राहुल सरतापे, प्रयास सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
(चौकट)
झाडांना फेटे....
सामाजिक बांधिलकी जोपासत प्रयास सामाजिक संस्थेने येरळा नदीकाठी शेकडो वृक्षांचे संवर्धन करून खटाव तालुक्यात वेगळा ठसा उमटविला आहे. याची दखल घेत माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे यांनी वृक्षांचा मनोमनी सन्मान करत फेटे बांधून खऱ्या अर्थाने सन्मान केला.
१५वडूज
फोटो:- येथील येरळा नदीकाठी वृक्षांचा वाढदिवस साजरा करताना माजी सभापती संदीप मांडवे, डाॅ. कुंडलिक मांडवे, प्रा. सोहन मोहळकर आणि सर्व सदस्य उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)
-----------------------------------
------------------