‘होयबां’ंमुळे विकासाला खीळ

By Admin | Published: January 27, 2015 10:39 PM2015-01-27T22:39:27+5:302015-01-28T00:58:02+5:30

बाळासाहेब बाबर : अतिक्रमणांना पाठीशी घातले जाते

'Yes,' bolstered development due to 'Yes' | ‘होयबां’ंमुळे विकासाला खीळ

‘होयबां’ंमुळे विकासाला खीळ

googlenewsNext

सातारा : विरोधी पक्षनेता अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी अतिक्रमण या मोहिमेवरून ‘धनदांडग्यांना संरक्षण आणि गोरगरीबांची पिळवणूक’ असा पालिकेचा कारभार सुरू आहे. बेकायदेशीर अतिक्रमणधारकांना पालिका पदाधिकारीच पाठीशी घालत आहेत. पालिकेत ‘होयबा’ नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने नागरिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले जात नसल्याने घनकचरा सारखे प्रकल्प आणि अतिक्रमणे काढली जात नाहीत, असा आरोप बाबर यांनी करत पालिका कारभाराचे वाभाडे काढले.पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली छ. शिवाजी सभागृहात मंगळवारी झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील २१ विकास कामांच्या विषयांपैकी २० विषयांना सभागृहात मंजूरी देण्यात आली. शहराच्या हद्दीबाहेरील उपनगरे व शाहूपुरी ग्रामपंचायतीचा कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकण्याच्या विषयास मंजूरी न देता तो विषय स्थगिती देण्यात आली. सभेला नविआ, साविआ आघाडीचे नगरसेवकांची उपस्थिती होती.
शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने मोहिम हाती घेतली. अतिक्रमणे काढताना मुख्य रस्त्यांवरील धनदांडण्यांच्या इमारतीची अतिक्रमणे न हटविता गोरगरीबांची गल्लीबोळातील अतिक्रमणे काढून दिखावा केला आहे. त्याचबरोबर यापुर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिका हद्दीतील करंजे तर्फ सातारा औद्योगिक वसाहतीत पालिकेच्या अतिरीक्त जागा काहींनी बळकावून अतिक्रमण केले आहे. त्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात चौकशी समिती नेमून काढण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. अतिक्रमण विषयांवर सभागृहात केवळ चर्चा होते, कारवाई होत नाही. हे गतीमान कारभाराचे लक्षण नाही अशी टिकाही केली. रवी पवार यांनी प्रभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी पुरवठा अभियंता पंढरीनाथ साठे यांना धारेवर धरले. साठे यांची बदली झाल्याने पाणी प्रश्न ते गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे गणेश टाकीतून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यासाठी साठे यांना फोन केला तर त्यांचा फोन लागत नाही. फोन बंद केलेला असतो. यावर साठे म्हणाले, माझा फोन चालू असतो, कधीही बंद नसतो. आपण पाणी किती वेळ सोडतो याचे वेळापत्रक देण्याची व्यवस्था करू असा खुलासा साठे यांनी सभागृहात केल्यावर रवी पवार भलतेच भडकले. अशा निरूउत्तर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी सभागृहात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)

घरपट्टीला व्याज आकारणीच्या विषयावर बोलताना नगरसेविका दिपाली गोडसे म्हणाल्या, ‘पालिका नागरिकांना घरपट्टी भरण्यासाठी केवळ घरपट्टी बील दिल्यानंतर तीन ते चार महिन्यांची मुदत देते. ती घरपट्टी भरण्याची अंतिम मुदत ही मार्च अखेरपर्यंत असते. मात्र देय तारखेपासून तीन महिन्यांत घरपट्टी भरली नाही तर त्यावर व्याज आकारणी केली जाते. मार्चपर्यंत अंतीम मुदत असल्याने व्याज आकारणी करू नये असा ठराव पालिकेने करावा आणि शासनाला पाठवावा,’ अशी मागणीही गोडसे यांनी केली.
पवारांकडून घरचा आहेर
पालिकेने शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहिम राबविली आहे. सदरबझारमध्ये सिम्बॉयसेस हॉस्पिटमध्ये पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले. अधिकाऱ्यांना माहिती समजल्यानंतर अधिकारी कारवाईसाठी गेले होते. मात्र सभागृहातील बहुचर्चित एका नगरसेवकांने त्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली, असा जाहीर आरोप रवींद्र पवार यांनी केला.

Web Title: 'Yes,' bolstered development due to 'Yes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.