होय.. मी माण, खटावमधील जनता अन् पाण्याचा पुजारीच: जयकुमार गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:51 PM2018-11-26T22:51:23+5:302018-11-26T22:51:28+5:30
दहिवडी : ‘होय, मी माण आणि खटावच्या स्वाभिमानी जनतेचा आणि मतदारसंघात येणाऱ्या पाण्याचा पुजारीच आहे. मला त्याचा अभिमानही आहे. ...
दहिवडी : ‘होय, मी माण आणि खटावच्या स्वाभिमानी जनतेचा आणि मतदारसंघात येणाऱ्या पाण्याचा पुजारीच आहे. मला त्याचा अभिमानही आहे. पिंगळी तलाव कालव्याची वर्क आॅर्डर आघाडीच्या कार्यकाळातील सप्टेंबर २०१४ मधील आहे. त्यापूर्वीच या कामाचे टेंडर झाले होते. उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात आणायला या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामुळे डिपॉझिट जप्त झालेले आणि दुकानदारीसाठी मंत्रालयात खेटे घालणारे ट्रस्टी होऊच शकत नाहीत,’ असा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी केला.
माण तालुक्यातील पिंगळी तलावात पोहोचणाºया उरमोडीच्या पाण्याचे यादव मळा येथे पूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अॅड. भास्करराव गुंडगे, एम. के. भोसले, अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, नगराध्यक्षा साधना गुंडगे, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, धनाजी जाधव, काँग्रेसच्या नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. गोरे म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांपूर्वीच मी उरमोडीचे पाणी माण तालुक्यात आणले आहे. लबाड आणि दुकानदारी करणाºया विरोधकांनाही ते माहीत आहे. आमदारकीचे डोहाळे लागलेल्यांना फोटोची भारी हौस
आहे, मात्र कॅनॉल आणि आलेले पाणीच कुठे आहे, हे त्यांना
माहीत नाही. माझ्या मतदारसंघासाठी पाणी हा जीवन मरणाचा प्रश्न
आहे. त्याची चेष्टा करू नका. एकदा समोरासमोर या. पाणी
योजनांसाठी कुणी काय केले, ते जनतेसमोर मांडू.’
विरोधकांची हौस पुरवू...
उरमोडीच्या पाण्यामुळे दहिवडीसह परिसराचा पाणीप्रश्न काहीअंशी हलका होईल; पण मी जिवंत आहे तोपर्यंत विविध योजनांचे शाश्वत पाणी आणणारच आहे. मी आणलेल्या पाण्याचे पूजन करण्याची विरोधकांची हौस कायमच पुरविली जाणार आहे, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला.