वाईत आज सायकल रॅली

By admin | Published: December 18, 2014 09:23 PM2014-12-18T21:23:21+5:302014-12-19T00:21:39+5:30

‘वाई फेस्टिव्हल : उद्या स्टॉल प्रदर्शन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Yesterday's cycle rally today | वाईत आज सायकल रॅली

वाईत आज सायकल रॅली

Next

वाई : प्राचीन काळापासून ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभलेल्या वाईनगरीला उत्सवाची परंपरा आहे. ती जपण्याचे आजही प्रयत्न केले जात आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ‘वाई फेस्टिव्हल’मध्ये आज शुक्रवार दि. १९ रोजी शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘वाई फेस्टिव्हल’चे हे सातवे वर्ष असून, ‘लोकमत’ याचे माध्यम प्रायोजक आहे. रोटरी क्लब, वाई आणि उत्कर्ष पतसंस्थेच्या वतीने ‘वाई फेस्टिव्हल २०१४’ चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १९ रोजी महागणपती घाटापासून सकाळी साडेसात वाजता सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. २० रोजी सकाळी दहा वाजता गोविंद रामेश्वर मंगल कार्यालय येथे महिला बचत गट स्टॉल, विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सायंकाळी साडेसहाला देश मेरा रंगीला नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ रोजी सकाळी १० ते ११ या कालावधीत काशिविश्वेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सायंकाळी साडेसहा ते साठेआठ महागणपती घाट येथे ‘हास्य षटकार’ विनोदी कार्यक्रम दिलीप हल्याळ व मृदूला मोघे प्रस्तुत. रात्री साठेआठ ते रात्री साडेदहा महागणपती घाट येथे खुल्या गटातील एकेरी नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे. सोमवार, दि. २२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता समूह नृत्य स्पर्धा आणि दि. २३ रोजी सात वाजता महागणपती घाट येथे उत्कर्ष श्री शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहेत. उत्कर्ष पतसंस्था, गणपती आळी येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)


लाभ घेण्याचे आवाहन
वाईकरांसाठी वाई फेस्टिव्हलच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम पाहाता येणार आहेत. वाईकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाई रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Yesterday's cycle rally today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.