तुमची ५६ इंचांची छाती आहे, मग ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही? शरद पवार यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:38 AM2019-03-25T01:38:42+5:302019-03-25T01:39:15+5:30

सत्तेचा गैरवापर, लोकांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, तरुणांना बेकार कसे करावे, याचा उत्तम नमुना म्हणून या मोदी सरकारकडे पाहिले पाहिजे. सीमेवर जवान प्राणांची आहुती देत आहेत.

You have a 56-inch chest, then why not solve 'Kulbhushan'? The question of Sharad Pawar | तुमची ५६ इंचांची छाती आहे, मग ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही? शरद पवार यांचा सवाल 

तुमची ५६ इंचांची छाती आहे, मग ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही? शरद पवार यांचा सवाल 

Next

क-हाड (जि. सातारा) : सत्तेचा गैरवापर, लोकांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, तरुणांना बेकार कसे करावे, याचा उत्तम नमुना म्हणून या मोदी सरकारकडे पाहिले पाहिजे. सीमेवर जवान प्राणांची आहुती देत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर त्याचा बदला आमच्या जवानांनी घेतला. पण पंतप्रधान मोदी त्याचा राजकीय लाभ उचलत आहेत. विंग कमांडर अभिनंदनला जागतिक पातळीवरील एका करारानुसार पाकिस्तानने सोडले. तुमची ५६ इंचांची छाती आहे, तर मग कुलभूषण जाधवला का सोडविले नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
क-हाड येथे रविवारी आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, दलित संघटनेचे जोगेंद्र कवाडे, प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, गत दोन वर्षांत राज्यात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, त्याचे सोयररसुतक मोदी सरकारला नाही. तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गत लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट नव्हती, त्यामुळे मत विभागणी झाली आणि मोदींनी दिलेल्या ढीगभर आश्वासनांना जनता भूलली. मात्र, आज विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे अशावेळी त्यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न भंगणार आहे.

भाजपाचे बाळ सेनेच्या ओट्यात
शिवाजी महाराजांच्या नावावर आजवर ज्यांनी आपले राजकारण केले. तीच शिवसेना आज छत्रपतींच्या वंशजाचा पराभवाचे स्वप्न पाहत आहे. त्यासाठी नुकतेच भाजपने आपले बाळ सेनेच्या ओट्यात घातले आहे; पण अशी भाड्याची माणसे आणून राजेंचा पराभव करणं शक्य नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

रामराजेंचा मला नेहमीच पाठिंबा - उदयनराजे
‘एकबार मैने कमिटमेंट कर दी, तो मैं खुदकी भी नही सुनता’ असा डायलॉग म्हणत उदयनराजे भोसलेंनी कॉलर उडवली. त्याला व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरच्या गर्दीने दाद दिली. तर रामराजे नाईक-निंबाळकर हे तर माझे कॉलेज जीवनापासूनचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा मला नेहमीच पाठिंबा असतो, असे उदयनराजेंनी सांगताच टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद मिळाला.

Web Title: You have a 56-inch chest, then why not solve 'Kulbhushan'? The question of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.