विनामास्क घराबाहेर पडाल.. दोनशे रुपयांना मुकाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:05+5:302021-03-30T04:23:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकावर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा ...

You will go out of the house without a mask .. Mukal for two hundred rupees! | विनामास्क घराबाहेर पडाल.. दोनशे रुपयांना मुकाल!

विनामास्क घराबाहेर पडाल.. दोनशे रुपयांना मुकाल!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकावर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून सोमवारी दिवसभरात दोनशेहून अधिक जणांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावून पडावे अन्यथा दोनशे रुपयांना नागरिकांना मुकावे लागणार आहे.

सातारा शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस तर हा आकडा शंभरीपार झाला आहे. अनेक जण घराबाहेर पडताना अद्यापही काळजी घेत नाहीत. विनामास्क गाडीवर बसून अनेक जण येरझाऱ्या मारताना पोलिसांना आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वाहनांची कागदपत्र तपासणीऐवजी तोंडाला मास्क आहे का, हे तपासण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांनी तपासणी केंद्र उभारले आहेत. सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत पोलिसांनी विनामास्कवर कारवाई केली. त्यानंतर दुपारच्या टप्प्यात रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे पोलिसांना फारशी कारवाई करता आली नाही. परंतु सायंकाळी पाचनंतर नागरिक घराबाहेर पडले. यावेळी पोलिसांना अनेक जण तोंडाला मास्क न लावता आढळून आले. अशा लोकांना पोलिसांनी तत्काळ जागेवर दोनशे रुपयांचा दंड केला. त्यामुळे इथून पुढे तरी संबंधित व्यक्ती मास्क घालूनच घराबाहेर पडेल, हा उद्देश पोलिसांचा दंड करण्यापाठीमागे आहे.

साताऱ्यातील राजवाडा, बसस्थानक, मोती चौक, कमानी हौद, पोवईनाका, विसावा नाका आणि समर्थ मंदिर या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केंद्र उभारली आहेत. विनामास्क फिरणाऱ्या कोणाचीही पोलिसांकडून गय केली जात नाही. जागच्या जागी दोनशे रुपयांची पावती फाडली जात आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल पाचशे रुपयांची पावती फाडली जात होती. परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा दंडाचा आकडा कमी करण्यात आला आहे.

चौकटः एसपी बन्सल यांचा शहरात दीड तास राऊंड

सातारा शहरासह जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रविवारी रात्री शहरात सुमारे दीड तास राउंड मारला. रात्री आठनंतर संचारबंदी असल्याने फिल्डवर राहून त्यांनी स्वत: आढावा घेतला. दरम्यान, शहरात सर्वत्र बंद ठेवण्यात आल्याचे चित्र होते.

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व रविवारी होळी सण असतानाच राज्य सरकारने नवे निर्बंध लावले. रविवारपासून रात्री आठ ते सकाळी सात संचारबंदीची घोषणा झाली. रविवारी सणासुदीचा दिवस असल्याने नागरिकांकडून याचे पालन होईल की नाही याची उत्सुकता होती. सातारकरांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी एसपी अजयकुमार बन्सल यांनी रविवारी रात्री आठ वाजता पोलीस मुख्यालयापासून शहरातील परिस्थिती पाहण्यासाठी सुरुवात केली. खालच्या रस्त्यावरून मोती चौक, राजवाडावरून ते समर्थ मंदिर चौकात गेले. तेथून नगरपालिका रस्त्यावरून शाहू चौक मार्गे राजपथावरून पुन्हा मोती चौकातून प्रतापगंज पेठ व पुढे राधिका रोडकडे गेले. शहरात ठिकठिकाणी ते फिरत असताना शेवटी पोवई नाका येथे आले. शहरातील परिस्थितीचा त्यांनी अशा प्रकारे आढावा घेतला.

Web Title: You will go out of the house without a mask .. Mukal for two hundred rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.