भरधाव कार पलटी होऊन झालेल्या अपघातात आगाशिवनगर येथील एक युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:02+5:302021-07-18T04:28:02+5:30
तीन युवक गभीर जखमी कराड-ढेबेवाडी रस्त्यावर कणसेमळा येथील दुर्घटना लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : भरधाव कार पलटी होऊन भिंतीला ...
तीन युवक गभीर जखमी
कराड-ढेबेवाडी रस्त्यावर कणसेमळा येथील दुर्घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : भरधाव कार पलटी होऊन भिंतीला धडक धडकली. यामध्ये आगाशिवनगर येथील एक युवक ठार तर तीन युवक गभीर जखमी झाले आहेत. कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा विंग, ता. कऱ्हाड नजीक शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
अमर पंजाबराव कचरे (वय ३२, रा. गणेश कॉलनी आगाशिवनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. जयदीप शांताराम जाधव (२४), निखिल सचिन कालेकर (२२), धैर्यशील प्रकाश कदम-पाटील (२५ सर्व रा. गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अपघातस्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर येथील चार युवक कार (एमएच ५० ए ६३६१) मधून शुक्रवारी रात्री ढेबेवाडीच्या दिशेने निघाले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास कार कणसेमळा, विंग हद्दीतील धोकादायक वळणावर आली असता कार चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे त्या वेगात कार पलटी झाली. पलटी घेत कार रस्त्यालगतच्या भिंतीला धडकली. या अपघातात चारही युवक गंभीर जखमी अवस्थेत कारमध्येच अडकून पडले होते.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल खाडे यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. जवळच वास्तव्यास असलेले चचेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य शहाजी पवार यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. अनेक प्रयत्न करूनही कार काढण्यात अपयश येत होते. शेवटी जखमींचा जीव वाचवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक खाडे यांच्यासह ग्रामस्थांनी कारची दरवाजे मोडून जखमींना रुग्णालयात पाठवले असता अमर कचरे याचे उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
फोटो
कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर कणसेमळा, विंग येथील धोकादायक वळणावर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. (छाया माणिक डोंगरे)
170721\1911-img-20210717-wa0012.jpg
फोटो कॕप्शन
कराड-ढेबेवाडी रस्त्यावर कणसेमळा, विंग, ता. कराड येथील धोकादायक वळणावर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाला होता. ( छाया- माणिक डोंगरे)