तरुणांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत भरती व्हावे

By admin | Published: January 21, 2017 09:11 PM2017-01-21T21:11:12+5:302017-01-21T21:11:12+5:30

शिशीर महाजन : आयडीयल किडस इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनात आवाहन

Young people should be admitted to National Defense Academy | तरुणांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत भरती व्हावे

तरुणांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत भरती व्हावे

Next

मलटण : ‘सैन्यदलात ग्रामीण भागातून अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी ‘एनडीए’मध्ये प्रवेशाचे प्रमाण खूप कमी आहे. शहरी भागातील तरुणापेक्षा ग्रामीण भागातील मुले शारीरिकरीत्या अधिक सक्षम असतात. फक्त त्यांना ज्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते त्याच्या मार्गदर्शनाची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध नसते. ‘आयडीयल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अशी एनडीए प्रवेश प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यास व अकादमीस सर्वतोपरी साह्य करण्यास तयार आहे,’ असे मत मेजर जनरल शिशीर महाजन व्यक्त केले.
आयडीयल किडस इंटरनॅशनल स्कूलच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘अगदी २ विद्यार्थ्यांपासून ही शाळा सुरू करून आज १००० विद्यार्थ्यांचा आलेख पाहता त्यांनी पालकांच्या कौतुकास पात्र ठरलेली एकमेव द्वितीय शाळा, या शब्दात शाळेचे आणि शाळेच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदे यांचे कौतुक केले.’
आयडीयल इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेह संमेलनाप्रसंगी शिशू वगार्पासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटिकांच्या माध्यमातून आपले कला, गुण सादर केले. यावेळी व्यासपीठावर संजय आवटे, नीता नेवसे, विजयराव बोरावके, रवींद्रराव पाटील, सुभाषराव शिंदे, रवींद्रराव येवले, डॉ. प्रसाद जोशी अच्चुतराव खलाटे, सतीश कवे यांची उपस्थिती होती. प्रमोद गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वा. प्र.)


आयडीयल किडस इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनात शिशीर महाजन यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Young people should be admitted to National Defense Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.