साताऱ्यातील एलबीएस कॉलेजचा देशपातळीवर गौरव, गौरव लोहार ठरले युवा शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 02:04 PM2018-10-22T14:04:53+5:302018-10-22T14:07:57+5:30

स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 Young scientists from Gwalior, Gaurav Lohar, LS College of Satara | साताऱ्यातील एलबीएस कॉलेजचा देशपातळीवर गौरव, गौरव लोहार ठरले युवा शास्त्रज्ञ

सातारा येथे एलबीएस कॉलेजचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ व इतर.

Next
ठळक मुद्दे साताऱ्यातील एलबीएस कॉलेजचा देशपातळीवर गौरव, गौरव लोहार ठरले युवा शास्त्रज्ञभौतिकशास्त्रातील संशोधनासाठी, केंद्राकडून २२ लाखांचा निधी

सातारा : स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत सायन्स व इंजिनिअरिंग संशोधन बोर्डामार्फत हा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारासाठी विज्ञान, तंत्रज्ञान या विषयात मुलभूत आणि उपयोजित संशोधन करणाºया ३५ वर्षांच्या आतील संशोधकांना हा पुरस्कार देण्यात येतो.

या पुरस्कारासाठी डॉ. गौरव लोहार यांनी सादर केलेल्या सपर कपेसिटर आणि बायोसेन्सर या विषयावरील संशोधन प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पासाठी शासनाकडून बावीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

डॉ. गौरव लोहार हे मूळचे वारुंजी, ता. कºहाड येथील असून यापूर्वी त्यांचे चाळीस आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या यापूर्वीच्या संशोधनासाठी त्यांनी स्वामित्व हक्क (पेटंट) साठी प्रस्ताव दाखल केला आहे. तसेच पंधरा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये व्याख्याने दिली आहेत.

शिवाजी विद्यापीठामार्फत त्यांनी यापूर्वी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच त्यांनी मॅनो मटेरियल्स फॉर द एनर्जी स्टोरेज अ‍ॅन्ड जनरेशन्स भरघोस असे काम केले आहे.

या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी कौतुक केले. त्यांच्या या प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. व्ही. जे. फुलारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
 


भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी शासनाने जाहीर केलेल्या निधीपैकी साडेदहा लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.
- डॉ. राजेंद्र शेजवळ,
प्राचार्य, एलबीएस कॉलेज, सातारा

Web Title:  Young scientists from Gwalior, Gaurav Lohar, LS College of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.