युवा पिढीने स्वत:बरोबर समाजाचा उद्धार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:09+5:302021-01-16T04:42:09+5:30

येथील भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ युवकांचे प्रेरणास्थान’ या विषयावर आयोजित एकदिवसीय ...

The younger generation should save the society along with themselves | युवा पिढीने स्वत:बरोबर समाजाचा उद्धार करावा

युवा पिढीने स्वत:बरोबर समाजाचा उद्धार करावा

Next

येथील भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ युवकांचे प्रेरणास्थान’ या विषयावर आयोजित एकदिवसीय ऑनलाइन चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सतीश माने, महेंद्र खैरनार यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

विधी महाविद्यालयात दरवर्षी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जयंती उत्सव ऑनलाइन घेण्याच्या सूचना विद्यापीठाने केल्या होत्या. त्यानुसार ‘स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ युवकांचे प्रेरणास्थान’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. प्रास्ताविक समन्वयक महेंद्र खैरनार यांनी केले. स्वागत प्राचार्य सतीश माने यांनी केले. तर, उषा मिशाळ-वायदंडे यांनी आभार मानले. यावेळी सायली भिसे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

- चौकट

निबंध स्पर्धेचे आयोजन

संजीवन हेल्पिंग अ‍ॅण्ड फाउंडेशन या संस्थेमार्फत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पारितोषिक मिळविणा-या हर्षवर्धन भिंगारदेवे, कोमल कांबळे, वसुधा चव्हाण या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेसह चर्चासत्रात सहभाग घेतला.

फोटो : १५केआरडी०२

कॅप्शन : मलकापूर येथील विधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीकांत माळकर, सतीश माने, उषा मिशाळ-वायदंडे आदी उपस्थित होते.

Web Title: The younger generation should save the society along with themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.